Vijay Rupani : लकी नंबर 1206 विजय रुपाणींसाठी ठरला Unlucky, आजची तारीख आणि सीट क्रमांक दोन्ही ठरले प्राणघातक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एक लकी संख्या मात्र गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींसाठी मात्र अनलकी ठरली आहे.
मुंबई : भारतातच नाही तर जगभरातील लोक काही लकी-अनलकी गोष्टींवरती विश्वास ठेवतात. ज्यात अंकांचा सर्वात मोठा प्रभाव असतो असं अनेक लोक म्हणतात. ज्योतीषशास्त्रात देखील अंक गणितीला महत्व आहे. सध्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर विराट कोहलीचा लकी नंबर 18 आहे. त्यामुळे त्याच्या जर्सीवर तो नंबर नेहमी दिसतो. मग ती टेस्ट मॅचची जर्सी असोत, टी 20 ची किंवा मग IPL ची. तसेच यावेळेचे IPL सिजन हा 18 वा असल्यामुळे यावर्षी विराटची टीम RCB ट्रॉफी जिंकणार अशी शक्यता वर्तवली जात होती आणि ती खरी देखील ठरली. या घटनेनं माणसाच्या आयुष्यात संख्यांचं कुठेतरी कनेक्शन किंवा महत्व आहे हे पटवून दिलं आहे.
पण अशीच एक लकी संख्या मात्र गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींसाठी मात्र अनलकी ठरली आहे.
1206 ही संख्या विजय रुपाणींसाठी लकी आहे. याच कारणामुळे त्यांची कार असोत किंवा बाईक दोघांच्याही नंबर प्लेटवर 1206 हा आकडा आहे. पण 1206 हा क्रमांकच विजय रुपाणींसाठी अनलकी ठरला आहे. आजची तारीख 12 जून, म्हणजेच 1206 च्या दिवशी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
आश्चर्य म्हणजे विजय रुपाणी यांच्या विमानाच्या सीटचा क्रमांक देखील 12 च होता. ते अहमदाबादवरुन लंडनला प्रवास करत होते, पण भयानक विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडिया 787-8 ड्रीमलायनर विमानाचा अपघात झाला. 12 जून 2025 रोजी घडलेल्या घटनेत फ्लाइट क्रमांक AI171 मध्ये प्रवासी आणि क्रू मेंबर्स मिळून 242 लोक होते. यांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये 1 प्रवासी बचावला, जो 11 क्रमांकाच्या सीटवर बसला होता. कदाचित विजय रुपाणी यांनी ही सीट मिळाली असती तरी त्यांचे प्राण वाचण्याची शक्यता जास्त होती.
advertisement
या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशातील राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन, राज्यसभा खासदार संबित पात्रा, तसेच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली. सगळ्यांनी विजय रूपाणी यांच्या जाण्याला भाजप आणि देशाच्या राजकारणाची अपूर्व आणि अपूरणीय हानी असल्याचं म्हटलं आहे.
विजय रूपाणी यांचं आयुष्य एक समर्पित राजकीय प्रवास होतं. त्यांच्या जाण्याने गुजरातने एक अनुभवसंपन्न नेता गमावला आहे. 12 हा अंक, जो त्यांच्या आयुष्याचा एक भाग वाटत होता, तोच शेवटी त्यांच्या शेवटचा अंक ठरला…
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 12, 2025 10:16 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Vijay Rupani : लकी नंबर 1206 विजय रुपाणींसाठी ठरला Unlucky, आजची तारीख आणि सीट क्रमांक दोन्ही ठरले प्राणघातक