Viral News: महिलेनं विमानात केलं विचित्र कृत्य, पाहून लोक काढायला लागले PHOTO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
आजकाल लोक कितीही लांबचं अंतर विमानाच्या मदतीनं अगदी काही वेळात पार करतात. त्यामुळे प्रवासाच्या अनेक गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत. विमानानं प्रवास करणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे.
नवी दिल्ली : आजकाल लोक कितीही लांबचं अंतर विमानाच्या मदतीनं अगदी काही वेळात पार करतात. त्यामुळे प्रवासाच्या अनेक गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत. विमानानं प्रवास करणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. अशातच विमानात अनेक विचित्र प्रकार घडताना समोर येत असतात. आत्तापर्यंत अनेक संतापजनक, किळसवाणे, धक्कादायक प्रकार विमानात घडले आहे. यात आणखी भर पडत विमानातील एक फोटो लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.
विमानात महिलेनं जे कृत्य केलं ते पाहून सगळेच प्रवासी चकित झाले. ते लगेच महिलेच्या त्या कृत्याचा फोटो काढायला लागले. महिलेचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
महिला विमानात विचित्र गोष्टी करु लागली. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला सामान ठेवतात त्या ठिकाणी जाऊन झोपली. ओवरहेड लगेज ठेवण्यासाठी असलेल्या जागेवर ती जाऊन बसल्यामुळे इतर प्रवासी थक्क झाले. ही नेमकी काय करतेय म्हणून काहीजण घाबरले. अनेकांनी तिचा काढलेला फोटो इंटरनेटवर सध्या खळबळ उडवत आहे.
advertisement

दरम्यान, फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही हे प्रकरण नेमकं काय होतं हे स्पष्ट झालं नाही. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर मात्र लोकांच्या कमेंटचा पाऊस पहायला मिळाला. लोकांनी मजा घेत कमेंट केल्या. अशा बऱ्याच घटना विमानात पहायला मिळतात ज्यावर विश्वास ठेवणंही कठिण होतं. अनेकदा लोकांना आपण कुठे काय करतोय याचंही भान राहत नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 10, 2024 9:01 PM IST


