advertisement

Viral Video : सीलिंग फॅनवर बसला होता भलामोठा किंग कोब्रा, श्वास रोखणारं दृश्य

Last Updated:

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडिओ आपल्याला सावध करणारे असतात. सध्या अशाच प्रकारची एक क्लिप इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. ही क्लिप पाहिल्यावर तुम्ही हादरून जाल.

सीलिंग फॅनवर बसला होता भलामोठा किंग कोब्रा
सीलिंग फॅनवर बसला होता भलामोठा किंग कोब्रा
नवी दिल्ली : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडिओ आपल्याला सावध करणारे असतात. सध्या अशाच प्रकारची एक क्लिप इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. ही क्लिप पाहिल्यावर तुम्ही हादरून जाल. सामान्यपणे रस्त्यावरून चालताना साप दिसला तर आपण मार्ग बदलून पुढे निघून जातो; पण विचार करा तुम्ही घरात आहात आणि तुमच्या वर साप लटकत असेल तर तुमची स्थिती कशी होईल? या व्हिडिओत असंच काहीसं दृश्य पाहायला मिळत आहे. हे पाहिल्यावर तुम्ही घरातला पंखा चालू करताना, त्यावर काही नाही ना हे एकदा नक्की तपासून पाहाल.
इन्स्टाग्रामवरच्या @chandrasekaran6102 नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत किमान 12 फुटाचा महाकाय किंग कोब्रा सीलिंग फॅनला वेटोळं घालून बसलेला दिसत आहे. हे दृश्य पाहिल्यावर कोणीही घाबरून जाईल. कोब्रा त्या पंख्यावर इकडे तिकडे फिरताना दिसत आहे. त्यामुळे हा पंखादेखील जोरात हलताना दिसत आहे. अशा स्थितीत हा कोब्रा खाली पडण्याचादेखील धोका दिसत आहे. क्षणभर विचार करा, जर तुम्ही या खोलीत याच पंख्याखाली झोपलेले असतात, तर हे दृश्य पाहिल्यावर तुमची अवस्था कशी झाली असती?
advertisement
45 हजारांपेक्षा जास्त लाइक्स
हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ दोन लाखांहून जास्त वेळा पाहिला गेला आहे. त्याला 45 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. पंख्याला वेटोळं घालून बसलेला कोब्रा पाहिल्यावर सोशल मीडिया युझर्स भयभीत झाले आहेत. हा पंखा एका झोपडीत लावला असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे हा नाग झोपडीच्या एखाद्या फटीतून आत आला आणि पंख्याला वेटोळं घालून बसला असावा, असं वाटत आहे.
advertisement
advertisement
सोशल मीडियावर नेहमीच वन्य प्राणी, सरपटणारे प्राणी, तसंच जलचर प्राण्यांचे खास व्हिडिओ शेअर केले जातात. या व्हिडिओजना खूप लाइक्सदेखील मिळतात. यापैकी काही व्हिडिओ मनोरंजक, तर काही धक्कादायक असतात. किंग कोब्राचा हा व्हिडिओ भीतिदायक आणि धक्कादायक आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर शेतात, अडगळीच्या ठिकाणी, जंगलात वावरताना किंवा अशा ठिकाणी घर असेल तर खूप काळजी घेणं आवश्यक असल्याचं जाणवतं. कारण अशी ठिकाणी साप, नाग किंवा किंग कोब्राचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा व्हिडिओ या संदर्भात प्रबोधन करणारा आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही.
advertisement
Keywords : Social Media, Viral Video, Instagram, King Cobra, Snake, Selling Fan, Weird Videos
Link : https://hindi.news18.com/news/ajab-gajab/viral-video-of-king-cobra-coiled-around-ceiling-fan-inside-house-8032552.html
स्वानंद
view comments
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : सीलिंग फॅनवर बसला होता भलामोठा किंग कोब्रा, श्वास रोखणारं दृश्य
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement