Weird Place Video - भारतातलं असं गाव जे आहे ढगात; इथं पोहोचण्यासाठी तुम्हाला...

Last Updated:

भारतातील या अद्भुत ठिकाणाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

ढगात वसलेलं भारतातील गाव
ढगात वसलेलं भारतातील गाव
नवी दिल्ली : आजवर तुम्ही बरीच ठिकाणं फिरलात असाल. देश-विदेशातील पर्यनटस्थळं पालथी घातली असाल. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतात एक असं गाव आहे जे चक्क ढगात आहे. परीकथेतील वाटावं असं हे ठिकाण प्रत्यक्षात आहे, तेसुद्धा भारतात. या ठिकाणाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
अशी काही ठिकाणं आहेत, जी अद्भुत आहेत. ती पाहिल्यावर स्वप्नातील किंवा परीकथेतील दुनिया वाटते किंवा एखाद्या हॉलिवूड फिल्ममधील सीन... असंच भारतातलं हे ठिकाण. जे चक्क ढगात आहे. तुम्ही भारतातील बरंच सुंदर गावं पाहिली असतील. पण असं गाव नाही. हे गाव पाहिल्यावर तुम्ही इथं जाण्यावाचून स्वतःला रोखू शकणार नाही.
मेघालयच्या पूर्व खासी हिल्स प्रदेशातील नॉन्जरोंग गाव. शिलाँगपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात प्रत्येकाला जावंसं वाटतं.  ढगांच्या मध्ये वसलेलं हे गाव खूप सुंदर आहे. हिरव्यागार टेकड्या, तिन्ही बाजूंनी खोल दऱ्या,  वाहणाऱ्या नद्यांचा आवाज, प्राचीन धबधबे, पक्ष्यांचा किलबिलाट... हे गाव मेघालयातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे...  इतकी सुंदर की स्वित्झर्लंडही यासमोर फेल आहे.
advertisement
गावात सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य अप्रतिम आहे. ते पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात आणि ढगांमध्ये काही काळ आनंद लुटतात. इथं गेल्यावर तुम्ही ढगांच्या कुशीत बसल्याचा भास होईल. पृथ्वी कुठंही दिसणार नाही.
काही लोक म्हणतात की पहाटेचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही पहाटे अडीच वाजता शिलाँग सोडलं पाहिजे, कारण शिलाँगहून इथं पोहोचण्यासाठी तुम्हाला 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. संध्याकाळच्या एक दिवस आधी पोहोचणं चांगलं. विशेष म्हणजे या भागात पथदिवे, साईन बोर्ड, पेट्रोल पंप आणि गुगल मॅपचीही मदत असणार नाही. तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी रस्त्यावर कोणीही सापडणार नाही. दाट धुक्यात हा मार्ग दऱ्याखोऱ्यात वळसा घालत आहे, त्यामुळे एक दिवस आधी संध्याकाळी इथे पोहोचलात तर बरं होईल.
advertisement
या सुंदर गावात संपूर्ण रात्र घालवा. इथं पारंपारिक खाद्यपदार्थांचा आनंद घ्या. संगीत ऐका. लोकांशी बोलण्यात वेळ घालवा. यापेक्षा चांगला आनंद तुम्हाला कुठेही मिळणार नाही. पारंपारिक जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावातील लोकांचा आदरातिथ्य पाहून तुम्ही रोमांचित व्हाल.  नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान इथं भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. या गावातील हवामान सर्वात आल्हाददायक आहे. उन्हाळ्यात दिवसभरात थोडी उष्णता जाणवेल.
advertisement
@GoNorthEastIN एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
मराठी बातम्या/Viral/
Weird Place Video - भारतातलं असं गाव जे आहे ढगात; इथं पोहोचण्यासाठी तुम्हाला...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement