Dangerous place Video - हे आहे जगातील सर्वात भयानक शहर; संध्याकाळी 6 नंतर इथं...

Last Updated:

एका ट्रॅव्हल ब्लॉगरने लोकांना जगातील सर्वात धोकादायक शहराची झलक दाखवली.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली, 04 डिसेंबर : प्रत्येक ठिकाणांचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. त्यानुसार काही ठिकाणं सुंदर काही भयानक, काही खतरनाक असतात. असंच एक हे शहर जे जगातील सर्वात भयंकर शहर म्हणून ओळखलं जातं. संपूर्ण जग फिरलेल्या एका ट्रॅव्हलरने या शहराबाबत सांगितलं आहे. त्याने या शहराचा व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे.
ड्र्यू बिन्स्की नावाचा ट्रॅव्हल ब्लॉगर, ज्याने जगातील 197 देशांना भेटी दिल्या आहेत. आपल्या अनुभवाच्या आधारे त्याने जगातील सर्वात धोकादायक शहराचा खुलासा केला आहे.जगातील सर्वात धोकादायक शहराची झलक त्याने दाखवली आहे.. या शहरात 2010 साली भूकंप आला होता, त्यात तीन लाख लोकांचा मृत्यू झाला होता.
advertisement
शहरातील रुग्णालये दुपारनंतर कर्मचाऱ्यांविना राहतात. अशा स्थितीत एखादा आजारी व्यक्ती रुग्णालयात आला तर त्याला मरण पत्करावं लागतं. जर कोणी आजारी पडला तर डॉक्टरांऐवजी त्याच्यावर वूडूने उपचार केले जातात इथं काळी जादू खूप केली जाते. इथं चांगली खाद्यपदार्थ उपलब्ध असलेली दुकानं फार कमी आहेत. शहरातील मिनरल वॉटर देखील अत्यंत दुर्गंधीयुक्त चवीने येते. या शहरात लोक संध्याकाळी 6 नंतर घराबाहेर पडत नाहीत आणि कोणालाही घरात येऊ देत नाहीत.
advertisement
आता हे शहर कोणतं हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. हे शहर आहे पोर्ट-ऑ-प्रिन्स, जी हैतीची राजधानी आहे. या व्यक्तीने जगातील सर्वात धोकादायक शहरांच्या यादीत या शहराला अग्रस्थानी ठेवलं आहे.
advertisement
Drew Binsky युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Dangerous place Video - हे आहे जगातील सर्वात भयानक शहर; संध्याकाळी 6 नंतर इथं...
Next Article
advertisement
Eknath Shinde Sharad Pawar : शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', पाहा Video
शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'',
  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

View All
advertisement