शंभर वर्षापासून बंद असलेलं जुनं घर कौडी मोलात विकलं, दरवाजा उघडताच नवीन मालकाला भलतंच दिसलं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
गालिच्याखालच्या तुटलेल्या लाकडातून त्यांना काही पायऱ्या दिसत होत्या, ज्या आत जात असल्यासारखे वाटत होते.
मुंबई, 03 डिसेंबर : हल्ली बहुतांश लोक हे मालमत्तेमध्ये गुंतवणूक करतात. जी एक चांगली गुंतवणूक देखील आहे. सध्या हा बाजार सर्वाधिक तेजीत आहे त्यामुळे काही वर्षात तुम्हाला दुप्पट परतावा मिळण्याची देखील शक्यता आहे. ज्यामुळे लोक फक्त जमीन किंवा घर खरेदीत पैसे गुंतवतात.
अनेकांना प्राचीन गोष्टींमध्ये खूप रस असतो. अशा परिस्थितीत ते जुन्या वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. पण यानंतर अनेक वेळा लोकांचे नशीब बदलते. एका व्यक्तीने त्याच्यासोबत घडलेली अशीच एक घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला.
एका व्यक्तीने 1900 मध्ये बांधलेले जुने घर खरेदी करण्यात आपली सर्व बचत गुंतवली. मात्र हे घर खूप जुने असल्याने आतील लाकडे दीमक सडले होते. पण देव्हा त्याने घर नीट पाहिलं तेव्हा त्याला धक्का बसला. या घरात एक रस्ता होता, त्याच्या भूगर्भात एक वेगळंच जग होतं. त्या व्यक्तीने त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, जिथून ते व्हायरल झाले.
advertisement

हे प्रकरण ब्रिटनचे आहे. 2020 मध्ये, बेन मान आणि त्यांची पत्नी किम्बर्ली यांनी एक घर विकत घेतले. हे घर शंभर वर्षे जुने होते. त्याच्या आधीच्या मालकाला ते विकून कशी तरी सुटका करून घ्यायची होती. यामुळे या जोडप्याला अत्यंत स्वस्त दरात घर मिळाले. मात्र खूप वर्ष झाल्यामुळे घरातील लाकूड खराब झाले होते. घराचे नूतनीकरण सुरू असताना, कार्पेट उचलताच त्यांना एक रहस्य समोर आले.
advertisement
गालिच्याखालच्या तुटलेल्या लाकडातून त्यांना काही पायऱ्या दिसत होत्या, ज्या आत जात असल्यासारखे वाटत होते.

जेव्हा हे जोडपे या पायऱ्यांवरून खाली उतरले तेव्हा ते थक्क झाले. त्यात दारूचे कोठार होते. आतमध्ये ओलावा असल्याने प्रचंड दुर्गंधी येत होती. या जोडप्याने सांगितले की, जर पायऱ्या नसत्या तर त्यांना या खोलीबद्दल कधीच कळले नसते. पण आता त्यांनी या खोलीला नवसंजीवनी दिली आहे.
advertisement
त्यांच्या घरातील ही गुप्त खोली पाहून जोडप्याला खूपच आनंद झाला आहे. आता या जोडप्यानं तिथे बार बनवला ज्याचा आनंद ते घेत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2023 9:15 PM IST
मराठी बातम्या/Viral/
शंभर वर्षापासून बंद असलेलं जुनं घर कौडी मोलात विकलं, दरवाजा उघडताच नवीन मालकाला भलतंच दिसलं