Fire Fact : आगीच्या रंगावरुन कळतं त्याचं तापमान; निळा, लाल, पिवळा 'या' रंगाच्या आगीचं Temperature किती?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आज आम्ही याच आगीबद्दल आणि त्याच्या स्वरुपाबद्दल काही माहिती सांगणार आहोत, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल.
मुंबई : आग किंवा अग्नी ही पंचमहाभूतांपैकी एक आहे. त्यामुळे त्याला अर्थ आणि महत्व आहे. थंडीत आगीमुळे एखाद्याला उर्जा मिळते आणि त्याचे प्राण वाचू शकतात. तर आगीमुळे अन्न शिजवण्यात मदत मिळते. एवढंच नाही तर आग ही अंधारात आपल्याला प्रकाश देते आणि मार्ग दाखवते. तसेच एखाद्या प्राण्यापासून आपले संरक्षण देखील करते. पण हीच आग जेव्हा मोठ्या प्रमाणात लागते तेव्हा मात्र लोकांचे प्राण देखील घेते. ज्यामुळे लोक आगीसोबत कधीही खेळू नये असे म्हणतात.
आज आम्ही याच आगीबद्दल आणि त्याच्या स्वरुपाबद्दल काही माहिती सांगणार आहोत, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल. तुम्हाला माहित आहे का की अग्नीचे तापमान त्याचा रंग पाहून सांगता येते? चला याबद्दल जाणून घेऊ.
कोणत्याही आगीचे तापमान जाणून घेण्यासाठी, आपल्याला त्याच्या रंगाकडे लक्ष द्यावे लागेल. तुम्ही जर नीट पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल की, घरातील आग, जळणाऱ्या वायूचा रंग, आगीत जळणाऱ्या लाकडाचा रंग किंवा पेटणाऱ्या पेट्रोलचा रंग पूर्णपणे वेगळा असतो. यावरुनच त्याचे तापमान सांगता येते.
advertisement
जर अग्नीचा रंग लाल असेल आणि घनता कमी असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. अशा स्थितीत आगीचे तापमान 500 अंश सेंटीग्रेडपेक्षा कमी असू शकते. याशिवाय, लाल रंगाच्या आगीचे तापमान 525 ते 900 अंश सेंटीग्रेड पर्यंत असू शकते. जर आगीचा रंग नारिंगी आणि चमकदार लाल असेल तर तापमान 1000 अंश सेंटीग्रेड पर्यंत असू शकते.
advertisement
जर तुम्हाला केशरी रंगाची आग आणि त्यात पिवळा रंग दिसला तर आगीचे तापमान 1100 ते 1200 अंश सेंटीग्रेडपर्यंत जाऊ शकते.
याशिवाय आगीचा रंग पिवळा आणि पांढरा असेल तर त्याचे तापमान 1300 ते 1500 अंश सेंटीग्रेडपर्यंत जाऊ शकते. या वेळी, आपल्याला याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे की जर आगीत पिवळ्या रंगाबरोबरच पांढऱ्या रंगाचे प्रमाण वाढत असेल तर तापमान 2500 अंश सेंटीग्रेडपर्यंत जाऊ शकते.
advertisement
जर तुम्हाला आगीचा रंग निळा दिसत असेल तर त्याचे तापमान 2500 ते 3000 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जाऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की जांभळ्या रंगाची आग सर्वात वेगवान आहे. जांभळ्या आगीचे तापमान 3000 अंश सेंटीग्रेडपेक्षा जास्त असू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 26, 2024 7:35 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Fire Fact : आगीच्या रंगावरुन कळतं त्याचं तापमान; निळा, लाल, पिवळा 'या' रंगाच्या आगीचं Temperature किती?










