Google Trends : भारतीय लोक गुगलवर का शोधतायत 5201314? याचा अर्थ समजला तर म्हणाल, 'अरे असं पण असतं का?'
- Published by:Devika Shinde
Last Updated:
What is Meaning of 5201314 : गुगलवर सगळे हा कोड सर्वात जास्त सर्च केला जातो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण 'स्टँपीड' आणि 'मेडे' यांसारख्या गंभीर शब्दांच्या बरोबरीने या रहस्यमय नंबरने Google च्या टॉप सर्च लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे.
मुंबई : आजकाल इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जगात दररोज नवनवीन शब्द, ट्रेंड आणि कोड जन्माला येत आहेत. यापैकी काही ट्रेंड खूपच अनोखे आणि विशेषतः तरुणाईसाठी आकर्षक असतात. 2025 मध्ये Google वर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या शब्दांमध्ये एका 7 अंकी कोडने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तो कोड आहे 5201314 (What is 5201314 ).
गुगलवर सगळे हा कोड सर्वात जास्त सर्च केला जातो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण 'स्टँपीड' आणि 'मेडे' यांसारख्या गंभीर शब्दांच्या बरोबरीने या रहस्यमय नंबरने Google च्या टॉप सर्च लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे, ज्यांना इंटरनेट आणि रिलेशनशिप ट्रेंड्सची फारशी माहिती नाही, त्यांच्यासाठी हा नंबर एखाद्या कोडवर्डपेक्षा कमी नाही.
Google Year in Search मध्ये या कोडची एन्ट्री
Google दरवर्षी आपला 'Year in Search' फीचर जारी करतो, ज्यात त्या वर्षात लोकांनी सर्वाधिक काय शोधले याची माहिती असते. 2005 मध्ये जिथे युद्ध, तणाव, सीझफायर यांसारख्या गंभीर शब्दांचा शोध घेतला गेला, तिथेच लोकांनी प्रेम आणि भावनांशी जोडलेल्या या 5201314 कोडचा अर्थ जाणून घेण्यात जबरदस्त उत्सुकता दाखवली.
advertisement
5201314 चा नेमका अर्थ काय आहे?
Google वर ट्रेंड करणारा हा 5201314 कोड एक चीनी इंटरनेट स्लॅंग आहे.
या 7 अंकी नंबरचा अर्थ आहे
"मी तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करतो/करते."
हा केवळ एक नंबर नाही, तर प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचा हा एक डिजिटल आणि गोड मार्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, विशेषतः तरुणाईमध्ये हा ट्रेंड झपाट्याने पसरला आहे.
advertisement
हा कोड चीनमधून आला कसा?
अंकांच्या उच्चारातून अर्थ काढण्याची ही पद्धत चीनी इंटरनेट संस्कृतीतून आली आहे. '520' चा उच्चार मंदारिन भाषेत केल्यास तो 'wǒ ài nǐ' (वो आय नी) या उच्चाराशी मिळताजुळता वाटतो. याचा अर्थ होतो मी तुझ्यावर प्रेम करतो.
1314 चा उच्चार 'yī shēng yī shì' (यी शेंग यी शी) या उच्चारासारखा येतो. याचा अर्थ होतो आयुष्यभर (Life Long).
advertisement
या दोन्ही भागांना एकत्र जोडल्यास, 5201314 चा अर्थ होतो मी तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करतो/करते.
नंबर वापरून प्रेम व्यक्त करण्याचा हा ट्रेंड तसा नवीन नाही. भारतातही पूर्वी '123 = I Love You' हा कोड तरुणांमध्ये लोकप्रिय होता. त्याच डिजिटल लव्ह कल्चरचा भाग म्हणून 5201314 आता जागतिक स्तरावर पसरला आहे. या कोडचा वापर आता केवळ चीनमध्येच नाही, तर जगभरातील रिलेशनशिप स्टेटस, सोशल मीडिया रील्स आणि चॅट्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
advertisement
त्यामुळे, पुढच्या वेळी कोणी तुम्हाला हा कोड पाठवला, तर समजून जा... ते फक्त नंबर नसून, तुमच्यावर आयुष्यभर प्रेम करण्याचे वचन आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2025 3:54 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Google Trends : भारतीय लोक गुगलवर का शोधतायत 5201314? याचा अर्थ समजला तर म्हणाल, 'अरे असं पण असतं का?'


