विषारी साप चावल्यावर सगळ्यात आधी काय करावं? विष पसरण्यापासून असं थांबवा, वाचेल जीव
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
मुंबई : भारतात दरवर्षी 58,000 लोकांचा साप चावल्यामुळे मृत्यू होतो. ही अधिकृत आकडेवारी आहे. मात्र, खरा आकडा यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पावसाळ्यात साप चावण्याच्या घटना वाढतात. 80 टक्के प्रकरणं ग्रामीण भागातील आहेत. बीबीसी Earth नुसार, भारतात सापांच्या किमान 300 प्रजाती आढळतात, त्यापैकी 60 प्रजाती विषारी आहेत.
कोणते साप विषारी?
यापैकी घोणस, फुरसे घोणस, इंडियन कोब्रा आणि मण्यार या चार प्रजाती सर्वात धोकादायक मानल्या जातात. साप चावण्याच्या बहुतांश घटनांमागे हे साप असतात
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, ग्रामीण भागात सर्पदंश झाल्यानंतर घरगुती उपाय केल्यामुळे लोकांना जीव गमवावा लागतो. अशा परिस्थितीत सर्पदंश झाल्यानंतर लगेच काय करावं, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि विषारी साप चावला आहे हे कसं ओळखावं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
advertisement
विषारी साप चावला, हे कसं कळेल?
अनेक वेळा असं घडतं की एखाद्या व्यक्तीला विषारी साप चावला नाही, तरीही धक्का बसल्याने किंवा घाबरून त्याचं हार्ट फेल होतं. याशिवाय काहीजण बेशुद्धही होतात. अशा परिस्थितीत विषारी सापाच्या चाव्याचे निशाण कसं दिसतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, सर्पदंशाच्या ठिकाणी दोन दातांची खूण दिसली तर समजून घ्या की, चावलेला साप विषारी आहे. जर चिन्ह दिसत नसेल तर विषारी साप चावला नसण्याची शक्यता आहे. पण याचा अर्थ असा नाही की अँटी व्हेनमची गरज नाही. याशिवाय विषारी साप चावल्यास त्या ठिकाणी तीव्र जळजळ, वेदना आणि सूज येऊ शकते.
advertisement
साप चावल्यास काय करावं?
साप चावलेल्या व्यक्तीला कुठेतरी आरामशीर जागी झोपायला लावा.
जर त्या व्यक्तीने घड्याळ, अंगठी, बांगडी इत्यादी कोणतीही घट्ट वस्तू घातली असेल तर ती काढून टाका. घट्ट कपडे काढा
साप चावलेला भाग हलक्या कपड्याने झाकून टाका.
पीडिताला शांत करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याला धक्का बसणार नाही.
त्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर जवळच्या आरोग्य केंद्रात अँटी व्हेनम इंजेक्शन मिळवून देण्याचा प्रयत्न करा.
advertisement
साप चावल्यावर हे करू नका -
जिथे साप चावला असेल तिथे घट्ट कपडे वगैरे बांधू नये.
दारू, चहा, कॉफी यासारख्या गोष्टी टाळा, कारण विष वेगाने पसरण्याची शक्यता असते.
सर्पदंशाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे थंड किंवा गरम काही लावून शेकवणं पूर्णपणे टाळा.
चावलेल्या भागाला हाताने दाबण्याचा प्रयत्न करू नका.
अनेक वेळा लोक सर्पदंशाच्या ठिकाणी कापून विष काढण्याचा प्रयत्न करतात, हे जीवघेणं ठरू शकतं. हे करू नका
advertisement
विष तोंडाने ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील करू नका.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 11, 2024 7:52 AM IST
मराठी बातम्या/Viral/
विषारी साप चावल्यावर सगळ्यात आधी काय करावं? विष पसरण्यापासून असं थांबवा, वाचेल जीव








