भारताचा सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्याबाबतील दिल्लीपेक्षा ही तब्बल 31 पट जास्त

Last Updated:

या एका जिल्ह्याचं क्षेत्रफळ इतकं अफाट आहे की त्याचा कारभार एकाच कलेक्टरच्या हातात असतो, तर यापेक्षा छोटे राज्यं चालवण्यासाठी मुख्यमंत्री आणि अनेक प्रशासक लागतात.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारताच्या नकाशावर अनेक लहान मोठे राज्ये, जिल्हे आणि शहरं आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, देशात एक असा जिल्हा आहे जो इतका मोठा आहे की त्याच्या पुढे काही राज्यंही लहान वाटतात? सांगा कोणत्या? आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल आणि नक्कीच या जिल्ह्याबद्दल आणि त्याचं नाव जाणून घेण्याची इच्छा होईल.
या एका जिल्ह्याचं क्षेत्रफळ इतकं अफाट आहे की त्याचा कारभार एकाच कलेक्टरच्या हातात असतो, तर यापेक्षा छोटे राज्यं चालवण्यासाठी मुख्यमंत्री आणि अनेक प्रशासक लागतात. समुद्राला भिडणारा हा भाग केवळ भौगोलिक दृष्ट्या नाही, तर आर्थिक दृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे.
सुरुवातीला वाटेल की हा एखादा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश किंवा राजस्थानसारख्या मोठ्या राज्यातला भाग असेल. पण नाही, हा पश्चिम भारतातील गुजरात राज्यातील “कच्छ” (Kutch) हा जिल्हा आहे. जो भारताचा सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
advertisement
कच्छ जिल्ह्याचं क्षेत्रफळ 45,674 चौ.किमी आहे, म्हणजेच हा हरियाणा, केरळ, गोवा अशा राज्यांपेक्षाही खूप मोठा आहे.
तुलना करायची झाली तर
हरियाणा 44,212 चौ.किमी, तर केरळ 38,863 चौ.किमी, गोवा 3,702 चौ.किमी आणि दिल्ली फक्त 1,484 चौ.किमी क्षेत्रफळ आहे. म्हणजेच दिल्लीपेक्षा 31 पट आणि गोव्यापेक्षा तब्बल 12 पट मोठा हा जिल्हा आहे. ुजरातच्या एकूण भूभागापैकी जवळपास 23% हिस्सा फक्त कच्छचाच आहे.
advertisement
कच्छचं भौगोलिक रूप
2011 च्या जनगणनेनुसार कच्छ जिल्ह्याची लोकसंख्या होती 20,92,371. मात्र, एवढ्या मोठ्या क्षेत्रात लोकसंख्या तुलनेने खूप कमी आहे. कारण या भागाचा मोठा हिस्सा दलदलीचा, वाळवंटी आणि रणाचा (Rann of Kutch) आहे. पावसाळ्यात इथं पाणी साचतं, तर हिवाळ्यात हेच रण पांढऱ्या मीठानं झाकलेलं सुंदर मैदान बनतं ज्याला जगभरातून पर्यटक पाहायला येतात.
advertisement
कच्छचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मीठाचं उत्पादन. भारतात सर्वाधिक मीठ याच जिल्ह्यात तयार होतं. तसंच इथली कला आणि हस्तकला जगभर प्रसिद्ध आहे भरतकाम, लाकडी कोरीव काम, दागिने, हस्तनिर्मित वस्त्रं यासाठी कच्छ ओळखला जातो.
आजचा कच्छ फक्त वाळवंट नाही, तर तो उद्योग आणि ऊर्जेचं नवं केंद्र बनला आहे. इथे भारतातील सर्वात मोठ्या पवनऊर्जा प्रकल्पांपैकी काही आहेत, तसेच विशाल सोलर पार्क्सदेखील आहेत. कच्छला लागून असलेला मुंद्रा बंदर (Mundra Port) भारतातील सर्वात मोठ्या खासगी बंदरांपैकी एक आहे, जिथून मोठ्या प्रमाणावर व्यापार आणि लॉजिस्टिक्सची कामं चालतात.
advertisement
कच्छमध्येच आहे धोलावीरा, सिंधू संस्कृतीतील एक प्राचीन शहर जे आज यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये गणलं जातं. इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्य हे सगळं कच्छला एक वेगळी ओळख देतं.
कच्छचा एवढा मोठा आकार पाहून काही वेळा प्रशासन सुलभ व्हावं म्हणून त्याचे दोन जिल्हे करण्याची चर्चाही झाली आहे. पण स्थानिक लोकांमध्ये मतभेद आहेत काही जण या कल्पनेच्या बाजूने आहेत, तर काहींना वाटतं की त्यामुळे कच्छची ओळख आणि सांस्कृतिक एकता कमी होईल.
view comments
मराठी बातम्या/Viral/
भारताचा सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्याबाबतील दिल्लीपेक्षा ही तब्बल 31 पट जास्त
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement