बायको रोज वांगी-बटाट्याची भाजी करते, नवऱ्याने दिला घटस्फोट; कोर्टही म्हणे, व्हा वेगळे!
- Published by:Sachin S
Last Updated:
बायकोला पनीर टिक्का येत नाही, ती दररोज वांगी आणि बटाट्याची भाजी करते. या एका क्षुल्लक कारणामुळे नवऱ्याने..
नवरा आणि बायकोमध्ये भांडण होणं ही काही नवी गोष्ट नाही. प्रत्येक घरात भांड्याला भांड लागतच अर्थात नवरा आणि बायकोची भांडणं, रुसवे फुगवे हे सुरूच आहे. पण हे चहाच्या पेल्यातलं भांडण दुसऱ्या क्षणाला विसरलंही जातं. पण, काही घरात मात्र परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. कुठे मारहाण तर कुठे अत्याचारपर्यंत कळस गाठला आहे. अशातच एक वेगळंच प्रकरण समोर आलं. बायकोला पनीर टिक्का येत नाही, ती दररोज वांगी आणि बटाट्याची भाजी करते. या एका क्षुल्लक कारणामुळे नवऱ्याने बायकोला घटस्फोट दिल्याचा प्रकार घडला आहे.
त्याचं झालं असं की, हे प्रकरण घडलं उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील परतापूर या गावात. या गावात राहणाऱ्या स्वीटी नावाच्या महिलेचं ४ वर्षांपूर्वी दिल्लीच्या शाहदरा येथील कमल नावाच्या तरुणासोबत लग्न झालं होतं. कमल हा एक बूट तयार करणाऱ्या कारखान्यात कामाला आहे. लग्नानंतर सुखाने संसार सुरू झाला. पण, लग्नाचे नऊ दिवस संपले आणि दोघांमध्ये कुरबुरी सुरू झाली.
advertisement
मारहाणीत स्विटीचा झाला गर्भपात
स्विटीला चांगलं जेवण बनवता येत नाही, अशी तक्रार नेहमी कमल करू लागला. त्यामुळे रोज दोघांमध्ये वाद होत होते. हा वाद इतका विकोपाला गेला की, कमलने स्विटीला मारहाणही केली. त्यामुळे साहजिकच मॅटर दोन्ही कुटुंबांना कळाला. त्यानंतर घरात बैठक बसवण्यात आली आणि कमलची समजूत काढण्यात आली. पण, धक्कादायक म्हणजे, कमलने केलेल्या मारहाणीमध्ये स्विटीचा गर्भपात झाल्याचं उघड झालं. त्यामुळे स्विटी ही माहेरी चालली गेली.
advertisement
त्यानंतर हे प्रकरण घटस्फोटाच्या अर्जावर येऊन ठेपलं. दोन्ही कुटुंबीयांनी घटस्फोटाची कौटुंबिक कोर्टात अर्ज केला. न्यायालयात जाण्याआधी कमल आणि स्विटीला समुपदेशन केंद्रात पाठवलं. पण तिथे काही उपयोग झाला नाही. अखेर प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टात सुनावणी सुरू झाली. 'लग्नानंतर कमलचं वागणे पूर्णपणे बदललं. तो छोट्या-छोट्या गोष्टींवरून रागवायचा आणि मारहाण करायचा. पनीन टिक्का चांगलं करता येत नाही म्हणून भांडायचा. अनेक वेळा त्याने मारहाणही केली. एकदा मी गर्भवती असतानाही कमलने भांडण केलं, ज्यामुळे गर्भपात झाला. आता मलाा घरात परत जायचं नाही, असा पवित्रा स्विटीने घेतला.
advertisement
कमलचा स्विटीवर मोबाईल चॅटिंगचा आरोप
view commentsतर कमलने मात्र स्विटीवर वेगळाच आरोप केला. स्विटीसोबत आपण असं कधीच वागलो नाही. उलट कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. स्विटी प्रत्येक गोष्टीवर रागवायची आणि माहेरच्यांच्या सांगण्यावरून घर सोडून गेली. स्वुटीला रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर चॅटिंग करण्याची सवय होती, त्याामुळे आमचं भांडण झालं. अनेकदा स्विटीला माहेरून परत आणण्याचा प्रयत्न केला, पण ती आली नाही, त्यामुळे मी वेगळं होण्याचा निर्णय घेतलं, असं कमलने कोर्टात सांगितलं. अखेर कोर्टाने दोन्ही गटाची बाजू ऐकून घेतली आणि घटस्फोट देण्यास मंजुरी दिली.
Location :
Uttar Pradesh
First Published :
November 08, 2025 11:33 PM IST
मराठी बातम्या/Viral/
बायको रोज वांगी-बटाट्याची भाजी करते, नवऱ्याने दिला घटस्फोट; कोर्टही म्हणे, व्हा वेगळे!


