गर्लफ्रेंड पाठवायची QR कोड, आशिक आजोबांच्या मनात लाडू फुटला, 60 दिवसानंतर बाजार उठला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑनलाईन भेटीमध्ये झालेल्या प्रेमामध्ये फसवणुकीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. 68 वर्षांच्या एका वृद्ध व्यक्तीलाही असाच धक्कादायक अनुभव आला आहे.
ऑनलाईन भेटीमध्ये झालेल्या प्रेमामध्ये फसवणुकीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. 68 वर्षांच्या एका वृद्ध व्यक्तीलाही असाच धक्कादायक अनुभव आला आहे. ऑगस्ट 2025 मध्ये 68 वर्षांचा एनजी नावाचा सेल्समन फेसबुकवर ली सिन नावाच्या एका चिनी महिलेला भेटला. यानंतर दोघांमध्येही बोलणं सुरू झालं आणि नंतर दोघांनी एकमेकांचे व्हॉट्सअॅप नंबर घेतले. दोघांमधल्या मैत्रीचं रुपांतर अखेर प्रेमात झालं, पण हे प्रेम नाही तर फसवणूक होती, हे वृद्धाच्या उशिरा लक्षात आलं.
ली सिनने क्युआर कोडच्या नावाखाली एनजीकडून 10 हजार सिंगापूर डॉलर्स (अंदाजे 6 लाख रुपये) उकळले. वृद्धाने जेव्हा ली सिनला भेटण्याची विनंती केली तेव्हा तिचं सिक्रेट उघड झालं. वृद्ध एनजीने जेव्हा ली सिनला भेटण्याची विनंती केली, तेव्हा तिने कारणं सांगायला सुरूवात केली, तेव्हा त्याला आपली फसवणूक झाल्याचं समजलं.
पोलिसांच्या तपासात ऑनलाईन फसवणुकीचं आणखी एक रॅकेट उघड झालं. श्रीमंत वृद्ध व्यक्ती, ज्यांच्याकडे पैसे आहेत, पण जोडीदार नाही, असा लोकांना पहिले हेरलं जातं आणि त्यांना आशेचा किरण दाखवून त्यांची फसवणूक केली जाते. वृद्ध एनजीसोबतही असंच झालं. त्याच्याकडै पेसे भरपूर होते, पण वेळ घालवण्यासाठी साथीदार नव्हता. ली सिनने त्याच्या या एकटेपणाचा फायदा घेतला.
advertisement
ऑगस्टमध्ये मैत्री सुरू झाली
एनजीचे आयुष्य सामान्य होते. निवृत्तीनंतर तो बहुतेक वेळ फेसबुकवर घालवत असे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, ली सिन नावाच्या एका प्रोफाइलने त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ली सिनचे प्रोफाईल फोटो आकर्षक होते, त्यामुळे एनजीने रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली, यानंतर दोघांमध्ये बोलायला सुरूवात झाली. ली सिनने एनजीला आपण चीनमध्ये राहतो, पण सिंगापूरला येऊ शकतो, असं सांगितलं. पण मागच्या गुन्ह्यामुळे आपल्याला प्रवेश मिळणार नसल्याचं तिने स्पष्ट केलं, यानंतर या लव्ह स्टोरीने वेगळं वळण घेतलं.
advertisement
काही दिवसांनंतर एनजीला सेक्शन चीफ वांग नावाच्या एका चिनी अधिकाऱ्याचा फोन आला. वांगने एनजीला आश्वासन दिले की, तो परमिटसाठी डिपॉझिट आणि हँडलिंग फी देईल, यानंतर ली सिन सिंगापूरला येऊ शकते. यानंतर त्याने एक क्युआर कोड पाठवला, जो एनजीने स्कॅन केला आणि त्याच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर झाले. पहिल्या आठवड्यामध्ये बरेच क्युआर कोड आले, पण प्रत्येक वेळी कारण वेगळं होतं.
advertisement
ट्रॅपमध्ये फसला वृद्ध
सप्टेंबरमध्ये ली सिंगापूरमध्ये आली आणि तिने विमानतळावरून फोटो पाठवले, पण आपण खूप जास्त दागिने घेऊन आल्यामुळे मला कस्टमने थांबवल्याचं तिने सांगितलं. कस्टममधून बाहेर येण्यासाठी आणखी पैसे लागतील, असं तिने एनजीला सांगितलं आणि पुन्हा क्युआर कोड पाठवला. एनजीने परत एकदा क्युआर कोड स्कॅन केला आणि हजारो डॉलर्स ट्रान्सफर केले.
advertisement
यानंतर ली सिनने आपल्या गाडीचा अपघात झाल्याचा आणि आपण हॉस्पिटलमध्ये असल्याचा मेसेज एनजीला केला, पण तिने हॉस्पिटलचं लोकेशन सांगितलं नाही. उपचारांसाठी आणखी पैसे हवे असल्याची मागणी ली सिनने केली. प्रत्येक वेळी, चिनी बँक खात्याशी जोडलेला क्यूआर कोड ट्रान्सफर केला जात होता. तरीही, एनजीला संशय आला नाही. भेटीच्या दिवशी ली सिनने ट्रॅफिक जाम असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर ती मलेशियाला पिकनिकसाठी निघून गेली. यानंतर अखेर ऑक्टोबर 2025 मध्ये एनजीचे डोळे उघडले आणि त्याने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस तपासात एनजीची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 9:08 PM IST
मराठी बातम्या/Viral/
गर्लफ्रेंड पाठवायची QR कोड, आशिक आजोबांच्या मनात लाडू फुटला, 60 दिवसानंतर बाजार उठला!