शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! सोयाबीनने हमीभाव दराचा टप्पा ओलांडला, सध्याचे बाजारभाव काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Soyabean Market Update : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात सध्या मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
मुंबई : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात सध्या मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात काही बाजारांत चांगली मागणी असल्याने दरांना आधार मिळाला असला, तरी काही ठिकाणी वाढलेली आवक आणि दर्जातील फरकामुळे दरांवर दबाव दिसून येत आहे. 19 आणि 20 जानेवारी 2026 रोजीच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, सोयाबीनचे सर्वसाधारण दर साधारण 4,300 रुपयांपासून थेट 6,000 रुपयांपर्यंत नोंदवले गेले आहेत.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. जालना बाजार समितीत तब्बल 6,826 क्विंटल आवक नोंदवली गेली असून येथे कमाल दर 5,500 रुपये प्रति क्विंटल मिळाले. अकोला येथे 4,623 क्विंटल आवक असून सर्वसाधारण दर सुमारे 5,000 रुपयांवर स्थिर राहिले. यवतमाळ बाजार समितीत मात्र चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला थेट 6,005 रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
advertisement
विदर्भ
विदर्भातील वाशीम, खामगाव, मंगरुळपीर आणि दिग्रस या बाजारांतही तेजीचे चित्र दिसून येते. वाशीम बाजारात कमाल दर 6,200 रुपये तर खामगाव येथे 6,200 रुपयांपर्यंत दर गेले असून सर्वसाधारण दर अनुक्रमे 5,600 आणि 5,788 रुपये नोंदवले गेले. मंगरुळपीर येथे देखील 6,290 रुपयांचा उच्चांकी दर मिळाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मराठवाडा
मराठवाड्यातील माजलगाव, पुसद, रिसोड, सेलु आणि तुळजापूर या बाजारांत सोयाबीनचे दर साधारण 5,000 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान राहिले आहेत. माजलगावमध्ये 1,076 क्विंटल आवक असून सर्वसाधारण दर 5,200 रुपये मिळाले. रिसोड येथे जवळपास 1,990 क्विंटल आवक असून दर 5,100 रुपयांच्या आसपास स्थिरावले आहेत. तुळजापूर बाजारात मात्र दर स्थिर राहून 5,200 रुपये प्रति क्विंटल इतकेच व्यवहार झाले.
advertisement
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात लासलगाव, लासलगाव-विंचूर आणि पिंपळगाव (ब) या बाजारांत दरांमध्ये मोठी तफावत पाहायला मिळाली. लासलगाव येथे मोठ्या प्रमाणावर म्हणजेच 886 क्विंटल आवक झाली असली तरी किमान दर 2,601 रुपये इतका नीचांकी नोंदवला गेला, तर चांगल्या प्रतीला 5,435 रुपयांपर्यंत भाव मिळाला. पिंपळगाव (ब) – पालखेड येथे हायब्रीड सोयाबीनला 5,380 रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला, मात्र काही कमी दर्जाच्या मालामुळे किमान दर खूप खाली गेला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 12:50 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! सोयाबीनने हमीभाव दराचा टप्पा ओलांडला, सध्याचे बाजारभाव काय?








