शेतकऱ्यांनो गैरसोय टाळा, जालना कृषी उत्पन्न बाजार समिती शनिवारी राहणार बंद, कारण काय?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी बंद राहणार आहेत. भुसार मार्केट, भाजीपाला मार्केट, गूळ मार्केट, किराणा मार्केट असे सर्व मार्केट शनिवारी बंद राहणार असल्याचं बाजार समितीमार्फत कळविण्यात आला आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : जालना ते नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित होत असलेल्या जमिनीला अत्यल्प दर दिला जात असल्याने शेतकऱ्यांनी देव मूर्ती इथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला आहे. याचाच एक भाग म्हणून जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी बंद राहणार आहेत.
advertisement
भुसार मार्केट, भाजीपाला मार्केट, गूळ मार्केट, किराणा मार्केट असे सर्व मार्केट शनिवारी बंद राहणार असल्याचं बाजार समितीमार्फत कळविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी रोजी आपला शेतमाल बाजार समितीत विक्रीस घेऊन येऊ नये आणि आपली गैरसोय टाळावी, असं आवाहन देखील करण्यात आले आहे.
advertisement
कृषी उत्पन्न बाजार समिती, जालनाचे भुसार मार्केट, गूळ मार्केट, होलसेल किराणा मार्केट आणि भाजी मार्केट हे शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादीत जमिनीचा रास्त मावेजा मिळत नसल्याने शेतक-यांचे धरणे आंदोलनास पाठिंबा म्हणून बाजार आवारातील व्यवहार बंद राहणार आहेत. याबाबत जालना आडतिया असोसिएशन, खरेदीदार असो, दालमिल असो, गूळ मार्केट असो, होलसेल किराणा मार्केट असोसिएशन, तसेच फळे व भाजीपाला असोसिएशन यांनी बाजार समितीस पत्र देऊन कळविले आहे.
advertisement
त्यामुळे शेतकरी बांधवांनी 1 फेब्रुवारी शनिवार रोजी आपला शेतीमाल विक्रीस आणू नये व आपली होणारी गैरसोय टाळावी, असं आवाहन बाजार समितीचे मुख्य प्रशासक आमदार अर्जुनराव खोतकर तथा सचिव मोहन राठोड यांनी केले आहे.
दरम्यान, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जालना येथून नांदेड पर्यंत जोडणारा जालना नांदेड समृद्धी महामार्ग प्रस्तावित आहे. यासाठी जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. 179 किमी सहा पदरी द्रुतगती मार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला शेतकऱ्यांचा विरोध आहे. कोट्यावधी रुपये किमतीच्या जमिनी 20 ते 25 लाख रुपये विक्री याप्रमाणे संपादित केल्या जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले असून 5 फेब्रुवारी रोजी सामूहिक आत्मदहनाचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे. याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालना कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
January 31, 2025 6:15 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांनो गैरसोय टाळा, जालना कृषी उत्पन्न बाजार समिती शनिवारी राहणार बंद, कारण काय?


