Black Sugarcane: सोलापूरच्या शेतकऱ्यानं पिकवला काळा ऊस, किलोला 100 रुपयांचा दर, का आहे खास?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Black Sugarcane: सोलापुरातील एका शेतकऱ्यानं काळ्या उसाची शेती केलीये. हा ऊस 100 रुपये किलो दराने विकला जातोय.
सोलापूर: सध्याच्या काळात शेतात विविध प्रयोग केले जात असून विविध पिके देखील घेतली जातात. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एका शेतकऱ्याने काळ्या उसाची शेती केलीये. महेश राजेंद्र पाटील असे अकोले बुद्रुक च्या या शेतकऱ्याचे नाव असून ते गेल्या 6 ते 7 वर्षापासून ही शेती करत आहेत. काळा ऊस खाण्यासाठी मऊ असून मॉल मध्ये किंवा इतर ठिकाणी 100 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. या ऊस विक्रीतून पाटील यांना वर्षाला 3 ते 4 लाखांचे उत्पन्न मिळत आहे. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
अकोले बुद्रुक येथील शेतकरी महेश राजेद्र पाटील यांनी बीएससी एग्रीकल्चर पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी 2 एकरात शिवकालीन काळ्या उसाची लागवड केली. प्रामुख्याने या उसाची लागवड गुजरात, मध्य प्रदेश मध्ये केली जाते. औषधी गुणधर्म पाहता या काळ्या उसाला अधिक मागणी आहे. जवळपास 30 रोगांवर हा ऊस गुणकारी आहे. या काळया उसाचा आयुर्वेदिक गुणधर्म शरीरासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो, असे शेतकरी महेश पाटील सांगतात.
advertisement
कसा आहे काळा ऊस?
काळ्या उसापासून विविध प्रोडक्ट तयार करून सुद्धा विक्री केली जाते. हा ऊस खाण्यासाठी गोड आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तीसुद्धा हा ऊस खाऊ शकतात. हा ऊस सोलण्यासाठी मऊ आहे. तर ज्याचे दात नाही त्यांना या काळया उसाचे लहान लहान तुकडे करून दिले तर ते सुद्धा हे ऊस खाऊ शकतात.
advertisement
वर्षाला 4 लाखाची कमाई
युवा शेतकरी पुरस्कार मिळालेले महेश पाटील काळ्या उसाची विक्री मोठमोठ्या मॉलमध्ये करतात. कृषी प्रदर्शनामध्ये आणि उसाच्या रस विक्री करणाऱ्यांना विक्री करत आहेत. हा शिवकालीन काळा ऊस 100 रुपये किलो दराने विक्री होतो. या उसापासून शेतकरी महेश पाटील हे वर्षाला 3 ते 4 लाख रुपयांची उलाढाल करत आहे. या उसामुळे बेरोजगार तरुणांना रोजगाराची चांगली संधी मिळू शकते, असे महेश पाटील सांगतात.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 03, 2025 2:31 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Black Sugarcane: सोलापूरच्या शेतकऱ्यानं पिकवला काळा ऊस, किलोला 100 रुपयांचा दर, का आहे खास?