advertisement

Agriculture Success: शेतकऱ्यानं डेरिंग केलं, एक लाख खर्चून लावली 250 झाडं, पहिल्याच वर्षी अडीच लाखांचा नफा!

Last Updated:

Agriculture Success: सोलापुरातील शेतकऱ्यानं एक लाख रुपये खर्चून दीड एकरात बोरीची बाग लावली, सहा महिन्यात उत्पन्न सुरू झाले असून भरघोस नफा मिळत आहे.

+
Agriculture

Agriculture Success: शेतकऱ्यानं डेरिंग केलं, एक लाख खर्चून लावली 250 झाडं, पहिल्याच वर्षी अडीच लाखांचा नफा!

सोलापूर : गेल्या काही काळापूर्वी सोलापूर हा दुष्काळी जिल्हा आणि हंगामी शेतीचा भाग म्हणूनच ओळखळा जायचा. परंतु, अलिकडे अनेक शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून यशस्वी शेती करत आहेत. मोहोळ तालुक्यातील अंकोलीचे शेतकरी भैरवनाथ पवार यांनी दीड एकरात ॲपल बोराची लागवड केली. यासाठी त्यांना एक लाखाचा खर्च आला. सहाच महिन्यात फळ सुरू झालं असून पहिल्या वर्षी अडीच लाखापर्यंत उत्पन्न निघणार असल्याचं शेतकरी पवार यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
भैरवनाथ आबासाहेब पवार हे पारंपरिक शेती करत होते. परंतु, ही शेती परवडत नसल्याने त्यांनी फळबागेची शेती करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदाच दीड एकरात ॲपल बोराची लागवड केली. दीड एकरात जवळपास 240 ते 250 ॲपल बोरांची झाडे लावली. लागवडीनंतर जवळपास सहा महिने झाले असून बोरं विक्रीसाठी बाजारात सुद्धा जात आहेत.
advertisement
एक लाखाचा खर्च
ॲपल बोराच्या झाडांवर भुरी आणि अळी या रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो. वेळोवेळी झाडांची पाहणी करून योग्य त्या रित्या फवारणी केली. ॲपल बोराचे रोपं, फवारणी आणि इतर खर्च मिळून जवळपास या बागेला 1 लाख रुपयापर्यंत खर्च आला आहे. तर सर्व खर्च वजा करून ॲपल बोराच्या बागेतून अडीच लाख रुपयापर्यंतचा उत्पन्न मिळणार आहे, असं पवार सांगतात.
advertisement
25 रुपये किलो दर
शेतकरी भैरवनाथ पवार हे सध्या सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बोरं विक्रीसाठी पाठवतात. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ॲपल बोराला 25 ते 27 रुपये किलो दर मिळत आहे. एकदा ॲपल बोर तोडणी सुरू झाली की ती जवळपास तीन महिने सुरू असते. तर एकदा लागवड केलेल्या ॲपल बोराच्या बागेतून आठ वर्ष उत्पन्न मिळतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांचे मागे न लागता आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करावेत आणि अधिकाधिक उत्पन्न घ्यावे, असा सल्ला पवार देतात.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture Success: शेतकऱ्यानं डेरिंग केलं, एक लाख खर्चून लावली 250 झाडं, पहिल्याच वर्षी अडीच लाखांचा नफा!
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement