Farmer Success Story: 10 गुंठ्यात लागवड, तीन महिन्यात मिळालं 1 लाख उत्पन्न, शेतकऱ्यानं असं काय केलं?

Last Updated:

शेतकरी कमी क्षेत्रात विविध प्रयोग करत चांगले उत्पन्न कसे मिळवता येईल हे विचार करून शेती करत आहेत. अशीच काहीशी शेती शेतकरी हनुमंत देशमुख यांनी केली आहे.

+
News18

News18

सोलापूर : शेतकरी कमी क्षेत्रात विविध प्रयोग करत चांगले उत्पन्न कसे मिळवता येईल हे विचार करून शेती करत आहेत. अशीच काहीशी शेती सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील शेतकरी हनुमंत देशमुख यांनी केली आहे. दहा गुंठा दोडक्याचे पीक घेऊन तीन महिन्यात 1 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेतले आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी हनुमंत देशमुख यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
मोहोळ तालुक्यात राहणारे हनुमंत देशमुख हे गेल्या पाच वर्षांपासून दहा गुंठ्यात दोडक्याची शेती करत आहेत. दोडका लावण्यापूर्वी जमिनीची मशागत करून बेड लावून शेणखत टाकून दोडक्याची लागवड करतात. दहा गुंठ्यात तीन फुटावर एक बी दोडक्याची लावली आहे. याची लागवड झाल्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर नागअळी होऊ नये म्हणून औषध फवारणी करतात.
advertisement
व्यवस्थितरीत्या देखभाल केल्यानंतर दीड महिन्यानंतर दोडका बाजारात विक्रीसाठी तयार होतो. दहा गुंठ्यात दोडका लागवडीसाठी हनुमंत देशमुख यांना 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो. तर सर्व खर्च वजा करून देशमुख यांना 1 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न या दहा गुंठ्याच्या दोडक्या शेतीतून अवघ्या 40 दिवसात मिळत आहे.
advertisement
एकदा लागवड केलेल्या दोडक्याची तोडणी जवळपास तीन महिन्यांपर्यंत चालते. सध्या बाजारात दोडक्याला 30 रुपये ते 800 रुपये किलो दर दोडक्याला मिळत आहे. तरी या दोडक्याची विक्री हनुमंत देशमुख सोलापूर, मुंबई, पुणे येथील मार्केटला विक्रीसाठी पाठवतात तसेच काही व्यापारी शेतीला भेट देऊन दोडक्याची पाहणी करून जागेवरूनच दोडक्याची खरेदी देखील करत आहेत.
advertisement
ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे त्यांनी उसाची लागवड न करता दोडक्याची लागवड करावी, खर्चही कमी आहे आणि उत्पन्नही जास्त मिळेल असा सल्ला अल्पभूधारक शेतकरी हनुमंत देशमुख यांनी दिला आहे.
मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story: 10 गुंठ्यात लागवड, तीन महिन्यात मिळालं 1 लाख उत्पन्न, शेतकऱ्यानं असं काय केलं?
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement