Turmeric Farming: पिवळं सोनं पिकवायचं, तर कशी असावी जमीन? हळदीच्या शेतीची संपूर्ण माहिती

Last Updated:

Turmeric Farming: कोणत्याही पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीच्या निवडीपासून त्याचे व्यवस्थापन गरजेचे असते. हळदीच्या पिकासाठीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

+
Turmeric

Turmeric Farming: पिवळं सोनं पिकवायचं, तर कशी असावी जमीन? हळदीच्या शेतीची संपूर्ण माहिती

प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली: कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी योग्य जमिनीची निवड करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. जमिनीचा पोत, प्रकार आणि पीएच उत्पादन वाढीवर परिणाम करतो. बऱ्याचदा जमिनीची निवड करताना शेतकऱ्यांची फसगत होते. यामुळे पिकाच्या उत्पादनासह शेतकऱ्यांच्या मेहनतीला देखील फटका बसतो. दुष्परिणाम टाळण्यासाठी पिकानुसार शास्त्रीय माहितीच्या आधारे योग्य जमिनीची निवड करणं फायदेशीर ठरतं. हळद लागवडीपूर्व व्यवस्थापनाची शास्त्रीय माहिती हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील कृषी सहाय्यक प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
हळद लागवडीसाठी जमिनीची निवड
हळद पिकाच्या लागवड पूर्व व्यवस्थापनामध्ये जमिनीची निवड, बियाणाची निवड यासह पूर्व मशागतीची पध्दत चांगल्या उत्पादनावर परिणामकारक ठरते. जमिनीची निवड करत असताना चुनखडीची जमीन पूर्णतः टाळावी. हळदीच्या पिकासाठी हलकी ते मध्यम जमीन उत्तम ठरते. तसेच मध्यम ते भारी जमीन असेल तरी चालेल. माळरानाची जमीन देखील चालते. परंतु, त्यामध्ये मुरमाचे प्रमाण जास्त असेल तर अशा जमिनी शेतकऱ्यांनी टाळाव्यात. हळद पिकासाठी जमिनीचा पीएच साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असावा.
advertisement
लागवडपूर्व मशागत 
15 दिवसांचे अंतर ठेवून जमिनीची उभी- आडवी नांगरट करावी. त्यानंतर हराळी, लव्हाळ्यासारख्या बहुवर्षीय तणांच्या काशा वेचून घ्याव्यात. एकरी 10 ते 15 टन चांगले कुजलेले शेणखत घालावे. पुन्हा रोटरच्या सहाय्याने जमीन भुसभुशीत करून घ्यावी. सरी वरंबे किंवा गादीवाफे तयार करावेत.
advertisement
बियाणे निवड
उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणाऱ्या हळदीच्या जातीची निवड करावी. कुरकुमा लौगा या वाणासह राजापूरी, कृष्णा, सेलम, एकुरपेठा हे उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारे वाण वापरू शकता. शक्यतो संशोधन केंद्राने शिफारस केलेले हळदीचे बियाणे वापरावे.
प्रति हेक्टरी लागवडीसाठी हळदीचे 2250 ते 2500 किलो गड्डे म्हणजेच प्रति हेक्टरी 22 ते 25 क्विंटल बेणे वापरणे आवश्यक आहे. लागवडीकरिता जेठे गोल गड्डेच वापरावेत. जेठे गोल गड्डे नसल्यास साधारणपणे 40 ते 45 ग्रॅम वजनाचे अंगठे गड्डे वापरावेत. 30 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे गड्डे लागवडीसाठी निवडू नयेत. लागवडीसाठी निरोगी बेण्यांची निवड करावी. कुजलेले, अर्धवट सडलेले बेणे लागवडीसाठी वापरू नये. परराज्यातून टिश्यूकल्चर द्वारे तयार केलेली रोपे शक्यतो टाळावीत, असे मोहिते-पाटील सांगतात.
मराठी बातम्या/कृषी/
Turmeric Farming: पिवळं सोनं पिकवायचं, तर कशी असावी जमीन? हळदीच्या शेतीची संपूर्ण माहिती
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement