दिसायला काळा, आतून वांग्यासारखा... अमेरिकन बटाट्याची मोठी कमाल, शेतकरी होतोय मालामाल! शेतीची माहिती जाणून घ्या कृषीतज्ज्ञांकडून
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
काळा बटाटा दिसायला काळसर आणि आतून जांभळा असतो. हृदय, मधुमेह, आणि लोहमूल्याच्या समस्यांसाठी गुणकारी आहे. योग्य शेती पद्धतीने आणि सेंद्रिय खतांचा वापर करून तीन महिन्यांत चांगले उत्पन्न मिळते.
भारतीय स्वयंपाकघरात बटाट्याला एक वेगळेच महत्त्व आहे. पण सध्या अमेरिकन काळ्या बटाट्याचीही चर्चा होत आहे. दिसायला काळसर असलेला हा बटाटा अनेक विशेष गुणांनी युक्त आहे. शेतकऱ्यांना काळ्या बटाट्याची शेती करून कमी कालावधीत मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. युवा कृषी तज्ज्ञ आकाश चौरसिया काळ्या बटाट्याच्या योग्य लागवड पद्धतींबाबत माहिती देत आहेत.
काळ्या बटाट्याची वैशिष्ट्ये : मल्टी-लेअर शेतीचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले आकाश चौरसिया काळ्या बटाट्याची शेती करतात. ते सांगतात की, "काळ्या बटाट्याची मूळ लागवड दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगांमध्ये होते. ही वन्य ट्युबर प्रकारातील पिके आहेत. हे पीक तीन महिन्यांत तयार होते. या बटाट्याचा वरचा भाग काळा असतो, तर आतील भाग गर्द जांभळा असतो. चवीला हा बटाटा सामान्य बटाट्यासारखा असतो. परंतु हृदयाचे आरोग्य, मधुमेह आणि रक्तातील लोहाच्या कमतरतेसाठी हा बटाटा औषधी ठरतो.
advertisement
लागवड पद्धत : काळ्या बटाट्याचे अधिक चांगले उत्पादन मिळवण्यासाठी चिकणमातीच्या रेतीमिश्रित जमिनीत लागवड केली जाते. जमिनीत 100 किलो चुना डस्ट आणि 50 किलो कडुलिंबाची पावडर किंवा 200 किलो कडुलिंबाच्या पानांचे मिश्रण टाकून शेत नांगरून भुसभुशीत करावे. लागवडीसाठी प्रति एकर 8 ते 10 क्विंटल बियाण्यांची गरज भासते. 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर हा काळ योग्य लागवडीसाठी आहे. हे थंड हवामानात येणारे पीक आहे. साधारणपणे प्रति एकर 100 क्विंटल उत्पादन मिळते. बाजारात हा बटाटा सहजपणे 40 ते 50 रुपये प्रति किलो दराने विकला जातो.
advertisement
खताचे व्यवस्थापन : खुल्या शेतात एकापाठोपाठ एक ओळीमध्ये एक फूट रुंद मळणी करून 8 ते 9 इंच अंतरावर आणि अर्ध्या फूट खोलीच्या सरी बनवून लागवड करावी. खुल्या शेतात बटाटा प्लांटरचाही वापर करता येतो. मल्टी-लेअर शेतीमध्ये चार फूट रुंद बेडवर तीन ओळीमध्ये 8 ते 9 इंच अंतरावर आणि 2.5 ते 3 इंच खोलीत लागवड करावी. उत्तम उत्पादनासाठी प्रति एकर 15 टन कुजलेले शेणखत, 600 किलो जैविक पोटॅश आणि 3 टन वर्मा फॉस किंवा फॉस्फो कंपोस्ट हे संतुलित सेंद्रिय खत म्हणून वापरावे. लागवडीनंतर 21 दिवसांनी मटक्या खताचे द्रावण पाण्यात मिसळून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने देणे आवश्यक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2024 12:50 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
दिसायला काळा, आतून वांग्यासारखा... अमेरिकन बटाट्याची मोठी कमाल, शेतकरी होतोय मालामाल! शेतीची माहिती जाणून घ्या कृषीतज्ज्ञांकडून


