गहू, तांदळासंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय! ग्राहकांसह शेतकऱ्यांना फायदा होणार की तोटा?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Open Market Sale Scheme : राज्यातील आणि देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. शेतीमालांमध्ये विशेषतः साखर आणि हरभरा यांसारख्या वस्तूंच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे
नवी दिल्ली : राज्यातील आणि देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. शेतीमालांमध्ये विशेषतः साखर आणि हरभरा यांसारख्या वस्तूंच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘ओपन मार्केट सेल स्कीम’ (OMSS) अंतर्गत गहू व तांदळाच्या थेट विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.
साखरेच्या दरात झपाट्याने वाढ
राज्यातील जालना, अकोला आणि बुलढाणा अशा बाजारपेठांमध्ये साखरेच्या दरात प्रति क्विंटल 50 रुपयांची वाढ झाली आहे. बहुतांश साखर कारखान्यांचा सध्याचा विक्री कोटा संपल्यामुळे मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात सटोरी व्यवहारांचीही जोरदार हालचाल सुरू आहे. सणासुदीचा काळ जवळ आल्याने दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
हरभऱ्याच्या दरात सतत वाढ
ऑस्ट्रेलियातून आयात होणाऱ्या हरभऱ्याचे उत्पादन ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित असल्यामुळे सध्या देशांतर्गत बाजारपेठेत हरभऱ्याला मोठी मागणी आहे. परिणामी व्यापारी वर्ग गुंतवणुकीसाठी हरभऱ्याकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे दर वाढून 5,200 रु ते 6,315 रु प्रति क्विंटल दरम्यान पोहोचले आहेत.
केंद्र सरकारचा निर्णय काय?
खाद्यधान्याच्या वाढत्या दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने ‘ओपन मार्केट सेल स्कीम’ (OMSS) अंतर्गत गहू व तांदळाची विक्री सुरू केली आहे. या निर्णयामुळे दरात स्थिरता येईल अशी अपेक्षा आहे.
advertisement
शेतकऱ्यांना काय फायदा?
याशिवाय, केंद्र सरकारने ‘ओपन मार्केट सेल स्कीम’ (OMSS) अंतर्गत गहू व तांदळाच्या थेट विक्रीचा निर्णय घेतल्याने बाजारातील दर काही अंशी स्थिर राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी ठराविक हमीभाव मिळवण्याची संधी राहील. अन्नधान्याच्या किमती अचानक घसरू नयेत, यासाठी हा निर्णय सकारात्मक ठरेल.
पुढील काही आठवडे निर्णायक
view commentsसणासुदीच्या काळात ग्राहक आणि व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असल्यामुळे बाजारात पुन्हा एकदा मागणी वाढू शकते. खाद्यतेल, साखर आणि हरभऱ्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच वेळी, सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे गहू-तांदळाच्या किंमती काही प्रमाणात नियंत्रणात राहू शकतात. सोन्या-चांदीच्या बाजारात मात्र अजूनही अस्थिरतेचे वातावरण कायम आहे.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
July 29, 2025 12:32 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
गहू, तांदळासंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय! ग्राहकांसह शेतकऱ्यांना फायदा होणार की तोटा?


