advertisement

Agriculture Success: छ. संभाजीनगरच्या शेतकऱ्यानं लावलं पैशाचं पीक, 8 एकरात 5000000 रुपयांची कमाई, यशाचा मंत्र काय?

Last Updated:

Agriculture Success: मराठवाड्यातील काही शेतकरी फळबागांच्या शेतीकडे वळत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी 8 एकर डाळिंब शेतीतून 50 लाखांवर कमाई करत आहेत.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही काळात मराठवाड्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत फळशेतीकडे वळत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील लाडसावंगी येथील शेतकरी बाबासाहेब पडूळ हे गेल्या 14 वर्षांपासून डाळिंब शेती करत आहेत. 300 झाडांपासून सुरू केलेली डाळिंब शेती आता 1800 झाडांवर गेली असून गतवर्षी तब्बल 28 लाखांचं उत्पन्न निघालं. तर यंदा दर चांगला असून 50 लाखांवर उत्पन्न जाईल, असे उद्यम पंडित पुरस्कार विजेते शेतकरी बाबासाहेब यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितले.
शेतकरी बाबासाहेब पडूळ सांगतात की, “सुरुवातीला पारंपारिक शेतीतून परिवाराचा उदरनिर्वाह भागवत असे. पण ही शेती परवडत नव्हती. तेव्हा अधिक उत्पन्न मिळावे यासाठी डाळिंब शेतीचा पर्याय निवडला. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेचा लाभ मिळाला. या योजनेतून 14 वर्षांपूर्वी 300 डाळिंब झाडांची लागवड केली. आता 8 एकर क्षेत्रात डाळिंबाची 1800 झाडे आहेत. यातून गरवर्षी 28 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. तर यंदा 50 लाखांपर्यंत उत्पन्न जाण्याचा अंदाज आहे.”
advertisement
रोगराईचा धोका
“डाळिंब शेती करताना अनेक अडचणी निर्माण होतात. फळबागेवर रोगराई पसरण्याचं संकट कायम असतं. डाळिंब या फळावर तेल्या आणि प्लेग रोगाचा प्रादुर्भाव दरवर्षी होत असतो. मात्र आपण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी न्युट्रेशन लेवल केले तर तेल्या आणि प्लेग रोगाला हरवू शकतो. त्यामुळे बिकट परिस्थितीत देखील फळबाग फायदेशीर ठरू शकते,” असेही पडूळ सांगतात.
advertisement
शेतकऱ्यांनी डाळिंबाची शेती करावी?
डाळिंब बागेत पैसा मिळू शकतो. त्यासाठी शेती करण्याच्या अगोदर सर्व औषधांची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच योग्य नियोजन करण्याची गरज असते. मातीचे आणि झाडांचे परिक्षण करून किंवा त्जज्ञांचे मार्गदर्शन घेऊन डाळिंब शेती करायला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि रोगराईवर नियंत्रण मिळवणे या बाबी डाळिंब शेतीसाठी महत्त्वाच्या ठरतात. तरुण शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक शेतीकडे वळले पाहिजे. दुसरीकडे कमी पैशात काम करण्यापेक्षा शेतीत मन लावून आणि नियोजनानुसार काम केलं तर 2 एकर शेतीत महिन्याकाठी 50 हजार रुपयांचे उत्पन्न निघू शकते, असे देखील पडूळ यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture Success: छ. संभाजीनगरच्या शेतकऱ्यानं लावलं पैशाचं पीक, 8 एकरात 5000000 रुपयांची कमाई, यशाचा मंत्र काय?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement