Crop Insurance Scheme: ... तर ‘त्या’ शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकणार, पीक विमा योजनेत 5 महत्त्वाचे बदल!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Scheme Crop Insurance Scheme: राज्य सरकारने पीक विमा योजनेत 5 महत्त्वाचे बदल केले आहेत. आता 1 रुपयांत मिळणारा विमा बंद झाला असून काळ्या यादीची तरतूद करण्यात आलीये.
जालना: महाराष्ट्र सरकारने 2025 च्या खरीप हंगामापासून सुधारित पीक विमा योजना लागू केली आहे. पूर्वीच्या पीक विमा योजनेत पाच महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना विम्याचा लाभ घेण्यासाठी नवीन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हे बदल अधिक पारदर्शकता आणि खऱ्या गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी करण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय.
पीक विमा योनजेतील बदल
- एक रुपयात विमा योजना बंद:
2023 पासून राबवली जाणारी ‘एक रुपयात पीक विमा योजना’ बंद करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी विम्याच्या रकमेच्या 2%, रब्बी पिकांसाठी 1.5%, आणि नगदी पिकांसाठी 5% प्रीमियम भरावा लागेल.
यापूर्वी स्थानिक नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान, आणि काढणी पश्चात नुकसान या तीन ट्रिगरच्या आधारे नुकसानभरपाई दिली जात होती. आता केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसानभरपाई मिळेल.
advertisement
विमा अर्जासाठी ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. नोंदणीकृत पिकांवरच विमा लागू होईल. यामुळे चुकीच्या पिकांच्या नोंदी टाळल्या जातील. त्याचबरोबर पूर्वी अनेक कंपन्यांचा समावेश या योजनेत होता परंतू आता ही जबाबदारी केवळ दोनच कंपन्यांना देण्यात आली आहे.
advertisement
पीक विमा योजनेत सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) असणे अनिवार्य आहे. यामुळे ॲग्रिस्टॅक योजनेशी संलग्नता वाढेल आणि पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल.
बोगस किंवा फसवणूक करून विमा लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाईल. यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही.
advertisement
या बदलांमुळे शेतकऱ्यांना 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. विमा अर्जासाठी आधार कार्ड, बँक खाते आणि सातबारा उताऱ्यावरील नाव समान असणे गरजेचे आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
July 12, 2025 1:56 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Crop Insurance Scheme: ... तर ‘त्या’ शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकणार, पीक विमा योजनेत 5 महत्त्वाचे बदल!