Mithi River Flyover: वेस्टर्न एक्सप्रेस वे ट्रॅफिक जाममधून होणार मुक्त, मिठी नदीवर पूल उभारणार; असा होईल फायदा
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Mithi River Flyover News: मुंबई महानगर पालिका मिठी नदीवर आणखी एक उड्डाणपूल बांधण्याच्या तयारीमध्ये आहे. ज्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवे वरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीच्या टेंशनमधून मुक्ती मिळणार आहे.
मुंबईकराच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. बीएमसीकडून मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाहतूक कोंडीच्या झंझाळातून मुक्ती करण्यासाठी महानगर पालिका आणि राज्य शासन उड्डाणपूल आणि मेट्रोची सुविधा मुंबईकरांना देत आहेत. आता अशातच मुंबई महानगर पालिका मिठी नदीवर आणखी एक उड्डाणपूल बांधण्याच्या तयारीमध्ये आहे. ज्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवे वरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीच्या टेंशनमधून मुक्ती मिळणार आहे. बीएमसीच्या पूल विभागाकडून माहिमच्या सेनापती बापट रस्त्यावर फिशरमन कॉलनी ते वांद्रे पूर्व पर्यंत उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेतलाय.
गेल्या तीन वर्षांपासून या ब्रिजचं काम अजूनही कागदावरच आहे. 2022 पासून या पुलासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. परंतु त्या निविदेसाठी कोणीही प्रतिसाद दिलेला नाही. आता अशातच पुन्हा एकदा पूल विभागाने टेंडर मागितले आहे. ब्रिज बनवण्यासाठी 220 कोटी 17 लाख रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनचालकांना वाहन चालवताना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो. यामध्ये कायमच वांद्रे पूर्व मिठी खाडीपासून माहिमच्या सेनापती बापट मार्गापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. ज्याचा परिणाम दादरपर्यंत आणि खार, सांताक्रूझपर्यंत होतो. या वाहतूक कोंडीचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी सेनापती बापट मार्गावरील मच्छिमार कॉलनी ते वांद्रे पूर्वपर्यंत उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे.
advertisement
वांद्रे पूर्व भागातील कलानगर उड्डाण पुलाच्या जवळून हा नवीन उड्डाण पूल सुरू होईल, जो मिठी खाडीवरून सेनापती बापट मार्गाला जोडेल. यामुळे उपनगर ते दक्षिण मुंबई प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. 2022 मध्ये त्या उड्डाणपुलासाठी निविदाही काढण्यात आली होती. जी तांत्रिक अडचणींमुळे निविदा प्रक्रिया मागे घेण्यात आली होती. त्यानंतर जुलै 2023 मध्ये निविदा काढण्यात आली. पण, त्या निविदेला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय, निविदेची अंतिम मुदत संपल्यामुळे आता महानगरपालिकेच्या पूल विभागाने नवीन निविदा जाहीर केली आहे. त्यासाठी 220 कोटी 17 लाख 40 हजार रुपयापर्यंत खर्च येणार आहे. हा पूल मिठी नदीच्या खाडीवरून जाणार असल्यामुळे कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) आणि वन विभागाकडूनही परवानगी घ्यावी लागेल. ही परवानगी घेण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असेल.
advertisement
पश्चिम द्रुतगती महामार्गावर हा पूल फायदेशीर ठरेल. हा पूल तब्बल दीड ते अडीच किलोमीटर लांबीचा असेल. सध्या या पट्ट्यात चुनाभट्टी ते बीकेसी आणि जुना कलानगर उड्डाणपुल आहे. याशिवाय, माहिमजवळ वांद्रे पूर्वेसाठी एक उड्डाणपुल देखील बांधला जाईल. यामुळे भविष्यात या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 7:38 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mithi River Flyover: वेस्टर्न एक्सप्रेस वे ट्रॅफिक जाममधून होणार मुक्त, मिठी नदीवर पूल उभारणार; असा होईल फायदा










