पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्याचा अनोखा जुगाड, आवाजाने वन्यप्राणी आणि पक्षी थांबणारच नाहीत
- Published by:Mohan Najan
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
वन्यप्राणी आणि पक्षांपासून पिकांचे संरक्षण करणे, हे फार महत्त्वाचे असते. यामुळे वन्यप्राणी आणि पक्षांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी धाराशिवमधील शेतकऱ्याने असं उपकरण बनवलंय की ज्याला अनेक ठिकाणाहून मागणी होतेय.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : शेतकरी हा शेतात राबून आपल्या शेतातील पिकांना वाढवतो. मात्र, अनेकदा वन्यप्राणी आणि पक्षांपासून पिकांच्या नुकसानीचा धोका असतो. अशा परिस्थितीत वन्यप्राणी आणि पक्षांपासून पिकांचे संरक्षण करणे, हे फार महत्त्वाचे असते. यामुळे वन्यप्राणी आणि पक्षांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी धाराशिवमधील शेतकऱ्याने असं उपकरण बनवलंय की ज्याला अनेक ठिकाणाहून मागणी होतेय.
वन्य प्राणी आणि पक्षांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी धाराशिव तालुक्यातील कारी येथील गंगाधर जाधव या शेतकऱ्याने हवेवर चालणारा पंखा तयार केलाय. हे उपकरण असं बनवल आहे की त्याला विजेची गरज पडत नाही. हवेची झुळूक आली तरी हा पंखा फिरतो आणि साखळी प्लेटवर आदळून आवाज निघतो आणि याच आवाजाने वन्यप्राणी आणि पक्षी निघून जातात. पिकांचे संरक्षण होते.
advertisement
हे जुगाड त्यांनी सुरुवातीला स्वतःसाठी बनवलं. त्यानंतर ह्याच्यापासून वन्यप्राणी आणि पक्षांपासून संरक्षण होत असल्याने त्यांनी हे उपकरण बनवून व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. सुरुवातीला त्यांनी काही उपकरणे तयार करून बाजारात विक्रीसाठी नेली. अवघ्या तासाभरात ही उपकरणे विकली गेल्यानंतर शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालेला पाहून त्यांनी अनेक उपकरण तयार करायला सुरुवात केली. त्यांना दरवर्षी या उपकरणाच्या व्यवसायातून 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळतं.
advertisement
खरंतर पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना पिकांची काळजी घ्यावी लागते. हरीण, रानडुक्कर पिकात घुसून पिकाचं नुकसान करतात, पीक फस्त करून टाकतात. त्यामुळे हे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून हा पंखा वापरला जात आहे. या उपकरणाच्या आवाजाने प्राणी आणि पक्षी पळ काढतात. त्यामुळे हे उपकरण खरेदीला शेतकऱ्यांची मोठी संधी मिळते.
advertisement
पाईप, एक्सेल, लोखंडी गोलकडे,साखळी आणि पंख्याचे पाते या साहित्यापासून हवेवरील हा पंखा त्यांनी तयार केला. हवेची झुळूक येताच हा पंखा फिरतो आणि प्लेट वाजण्यास सुरुवात होते. या आवाजामुळे वन्य प्राणी आणि पक्षांपासून पिकांचे संरक्षण होते. त्यामुळे धाराशिव, तुळजापूर, बार्शी येथील दुकानदारांकडून या उपकरणाला मोठी मागणी असते तर जम्मू-काश्मीर,तामिळनाडू, केरळ येथील शेतकऱ्यांनी देखील हे उपकरण मागवले असल्याचे यावेळी बोलताना जाधव यांनी सांगितलं.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
November 13, 2024 4:21 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्याचा अनोखा जुगाड, आवाजाने वन्यप्राणी आणि पक्षी थांबणारच नाहीत