नशिबाने हरविले मात्र तो कुठे ही थांबला नाही, दिव्यांग असूनही करतो असं काम पाहून कराल कौतुक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
छायाकांत हा आज आपल्या हिंमतीने त्याच्या पायावर उभा आहे. हा तरुण कोणाचीही मदत न घेता स्वतःहा व्यवसाय करत आहे.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : नशिबाच्या चक्रव्याहातून कोण बर सुटले आहे. असेच नाशिकमधील एका अंध तरुणाला देखील नशिबाने हरविले मात्र तो कुठे ही थांबला नाही. मात्र त्याचे विचार या दुनियेपेक्षा ही रंगीत आहेत. छायाकांत साहू लहान पणापासून काही पाहू शकत नसल्याने त्याला अनेक अडचणी ह्या येत गेल्या आज देखील तो अडचणींना मोठ्या हिंमतीने सामोरे जात आहे. छायाकांत हा आज आपल्या हिंमतीने त्याच्या पायावर उभा आहे. हा तरुण कोणाचीही मदत न घेता स्वतःहा व्यवसाय करत आहे.
advertisement
छायाकांत याला दिसत नसल्याने शिक्षण देखील पूर्ण घेता आलेले नाही. तुला काही दिसत नाही तुझ्याने काही होणार नाही. तू घरी बस आम्ही तुला सांभाळू हे लहान पणा पासून छायाकांत याचे आई-वडील त्याला सांगत आले आहेत. शहरात त्रास होईल म्हणून वडिलांनी छायाकांत याला गावी त्याच्या आजी आजोबांकडे पाठविले. लहान पण हे घरातच गेले. शाळा शिकण्याची इच्छा असून देखील शाळेत न जाऊ शकणार छायाकांत ह्याने गावातील एका शाळेत 7 वी पर्यंत शिक्षण कसे बेस घेतले. त्यानंतर छायाकांत ह्याला शिक्षण सोडावे लागले.
advertisement
2014 मध्ये छायाकांत हा आपल्या आई-वडिलांकडे पुन्हा नाशिकला आला. नाशिकला आल्यानंतर त्यांचे काही नवीन मित्र झाले परंतु आपला मुलगा सर्व साधारण मुलांन सारखा नाही ह्या विचाराने आई कुठे जाऊ देत नसे. परंतु छायाकांत याला त्यांच्या पायावर उभे राहून काही तरी स्वतःचे कारायचे होते. याकरिता छायाकांतहा घरबाहेर पडलाच.
advertisement
छायाकांत सांगतो की, माझे पत्रकार होण्याचे स्वप्न होत. पण कालांतराने स्वप्नच राहिले. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला पैसे कमावण्यासाठी भाग पाडले. शिक्षण नसल्याने आणि महत्वाचे म्हणजे अंधत्व असल्याने कुठेही काम मिळत नाही. म्हणून काही तरी व्यवसाय करावा ह्या विचाराने मी सीझननुसार व्यवसाय करण्याचे ठरविले.
advertisement
व्यवसाय करण्यासाठी पैसे जमवण्यासाठी सुरुवातीला 100 रोजाणे काम करण्यासाठी जात असे. त्यानंतर पैसे जमा करून अगरबत्ती ही रोडरोडवर जाऊन विकली. यामधून मला चांगले उत्पन होत आहे. तसेच आता मी सीझननुसार दिनदर्शिका विकत आहे. 65 रुपयाला एक असे रोजचे 60 ते 70 दिनदर्शिका ह्या विकल्या जात असल्याचे छायाकांत याने सांगितले.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
November 13, 2024 3:35 PM IST
मराठी बातम्या/नाशिक/
नशिबाने हरविले मात्र तो कुठे ही थांबला नाही, दिव्यांग असूनही करतो असं काम पाहून कराल कौतुक