advertisement

गव्हाच्या शेतीसाठी केला नवीन प्रयोग, आता मिळणार बंपर उत्पन्न, शेतकऱ्यानं कसं केलं नियोजन?

Last Updated:

जालना जिल्ह्यातील उटवद येथील राजेश शिंदे यांनी देखील अत्यंत कमी पाण्यावर टोकण पद्धतीने गव्हाची लागवड केली आहे. या माध्यमातून त्यांना 20 किलो गव्हाला 20 ते 25 कट्टे गव्हाचे उत्पन्न अपेक्षित आहे.

+
राजेश

राजेश शिंदे

जालना : शेती हा हल्लीच्या काळातील सर्वाधिक अनिश्चितता असलेला व्यवसाय झाला आहे. मात्र असं असताना देखील अनेक शेतकरी शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करून आपलं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतात. जालना जिल्ह्यातील उटवद येथील राजेश शिंदे यांनी देखील अत्यंत कमी पाण्यावर टोकण पद्धतीने गव्हाची लागवड केली आहे. या माध्यमातून त्यांना 20 किलो गव्हाला 20 ते 25 कट्टे गव्हाचे उत्पन्न अपेक्षित आहे. ठिबकवर पाणी देऊन त्यांनी हा गहू जगवला आहे. पाहुयात कसं केलं राजेश शिंदे या शेतकऱ्याने गहू या पिकाचे नियोजन.
राजाभाऊ शिंदे हे उटवद या गावचे रहिवासी. त्यांच्याकडे पाच ते सहा एकर वडिलोपार्जित शेती आहे. परंतु शेतीसाठी पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे कपाशी उपटून नवीन दुसरं कोणतं पीक घ्यावया शोधात होते. कांदा पिकासाठी पाण्याची आवश्यकता जास्त असते. तर गहू पिकाला ही पारंपारिक पद्धतीने पाच ते सहा पाणी द्यावे लागतात. परंतु टोकण पद्धतीने एक किलो गव्हाला एक कट्टा उत्पन्न मिळतं असं ते ऐकून होते. प्रयोग म्हणून त्यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावर 20 किलो गहू टोकण पद्धतीने लागवड केला. टोकण पद्धतीने लागवड केलेल्या गव्हाला ठिबकची सोय केली. पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी देण्याचे नियोजन केलं. दर पाच-सहा दिवसांनी दोन किंवा तीन तास पाणी गव्हाला देत राहिले.
advertisement
पेरणी वेळी केवळ एक बॅग 20-20 झिरो 13 खताची मात्रा दिली. तसेच गव्हावर कोणतीही फवारणी करण्याची आवश्यकता त्यांना भासली नाही. सध्या हा गहू काढणीस आला असून 20 किलो गव्हाला त्यांना 20 ते 25 कट्टे म्हणजेच 12 ते 16 क्विंटल गहू होण्याची अपेक्षा आहे. एवढ्या कमी पाण्यावर पारंपारिक पद्धतीने गहू पीक घेणे शक्यच नव्हतं. परंतु इतरांचा ऐकलेला प्रयोग स्वतः शेतात करून पाहण्याचा निर्णय घेतला. यामागे कुटुंबापुरते गहू व्हावे आणि शेतामध्ये पिकाची फेरपालट व्हावी हाच उद्देश होता, असं राजाभाऊ शिंदे यांनी सांगितलं. इतर शेतकऱ्यांनी ही वेगवेगळे प्रयोग करून आपल्या शेती उत्पन्न वाढवावं, असं आवाहन देखील ते इतर शेतकऱ्यांना करतात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
गव्हाच्या शेतीसाठी केला नवीन प्रयोग, आता मिळणार बंपर उत्पन्न, शेतकऱ्यानं कसं केलं नियोजन?
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement