डोक्यात भन्नाट आयडिया आली! नोकरीचा राजीनामा दिला अन् थेट गाव गाठलं, शेतकरी या शेतीतून करताय 22 लाखांची कमाई

Last Updated:

Farmer Success Story :  आजच्या काळात तरुण पिढी पारंपरिक नोकऱ्यांपेक्षा शेतीकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहे. शेतीचे वैज्ञानिक ज्ञान, प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतूनही भरघोस उत्पन्न मिळू शकते, हे अनेक तरुणांनी सिद्ध केले आहे.

success story
success story
मुंबई : आजच्या काळात तरुण पिढी पारंपरिक नोकऱ्यांपेक्षा शेतीकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहे. शेतीचे वैज्ञानिक ज्ञान, प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतूनही भरघोस उत्पन्न मिळू शकते, हे अनेक तरुणांनी सिद्ध केले आहे. नोकरी सोडून शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेणाऱ्या अशाच शेतकऱ्याची प्रेरणादायी वाटचाल म्हणजे सुधांशू कुमार यांची यशोगाथा. बिहारमधील समस्तीपूर येथील राहणारे सुधांशू यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
advertisement
शेतीत घेतलेली विविध पिके
सुधांशू कुमार यांना सुरुवातीपासूनच शेतीत काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. लिची लागवडीची कल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी त्या दिशेने मोठ्या उत्साहाने काम सुरू केले. केवळ कल्पनेत न थांबता त्यांनी संशोधन, प्रशिक्षण आणि निरीक्षणावर भर दिला. कालांतराने त्यांनी 15 एकर जमिनीत लिचीसह स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट, कस्टर्ड ऍपल आणि इतर प्रगत फळपिकांची लागवड केली. आता ते शेतीतून दरवर्षी सरासरी 20 ते 22 लाख रुपये कमावतात.
advertisement
नोकरी सोडून शेतीकडे वळण्याचा मोठा निर्णय
इतिहास विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुधांशू यांनी केरळमधील मुन्नार येथील टाटा टी गार्डनमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून करिअरची सुरुवात केली. पगार चांगला, जीवन स्थिर आणि कुटुंबाला वेळ देण्याची संधीही होती. तरीही मनात एक हुरहूर होती. आयुष्यभर नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करायचा, शेतीकडे वळायचे. अखेर त्यांनी मोठा निर्णय घेत नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या गावी परतले.
advertisement
शेतीतील संघर्ष आणि शिकवण
गावी परतल्यावर त्यांच्यासमोर उजाड जमीन, सिंचनाची कमी साधने आणि बाजारपेठेचे मर्यादित ज्ञान असे अनेक प्रश्न उभे होते. पण सुधांशू मागे हटले नाहीत. त्यांनी आरपीसीएयू, पुसा येथील तज्ज्ञांचा सल्ला घेतला.
सुरुवातीला मिळणारे उत्पन्न फक्त 25 हजार रुपये होते, पण वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केल्यानंतर त्यांच्या मेहनतीला यश मिळू लागले. हळूहळू त्यांचे उत्पन्न 1 लाख 35 हजार रुपयेपर्यंत पोहोचले आणि यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला.
advertisement
तंत्रज्ञानामुळे बदलले भविष्य
लिची लागवड करताना त्यांना सर्वात मोठे आव्हान होते ते पाणी व्यवस्थापनाचे. सुरुवातीच्या अडचणींनंतर त्यांनी सूक्ष्म आणि स्प्रिंकलर सिंचन पद्धतीचा अवलंब केला. उत्पादन वाढले, पण बाजारपेठ मिळवणे सोपे नव्हते. त्यांनी मुझफ्फरपूरमधील प्रोसेसरशी संपर्क साधला. ते 100 किमी दूर राहत असूनही, ठरलेल्या वेळेनुसार सकाळी 9 वाजेपर्यंत लिची पोहोचवण्यासाठी त्यांनी रात्रभर कष्ट घेतले. अखेर त्यांच्या मेहनतीला भरघोस यश मिळाले आणि एका हंगामातच त्यांना 3 लाख 65 हजार रुपयांचा नफा झाला. शेतीतील आधुनिक तंत्रांचा वापर करून सुधांशू यांनी आपले उत्पन्न 3 लाखांवरून तब्बल 20 ते 22 लाखांपर्यंत नेले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
डोक्यात भन्नाट आयडिया आली! नोकरीचा राजीनामा दिला अन् थेट गाव गाठलं, शेतकरी या शेतीतून करताय 22 लाखांची कमाई
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement