पुण्यातील नोकरी सोडली! शेतात 500 झाडं लावली, मिळतोय सोन्याचा भाव, आता तरुण करतोय लाखोंची कमाई

Last Updated:

Success Story : मनात जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल तर अशक्य काहीच नाही, हे सिद्ध करून दाखवले आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील तरुण तुषार नंदनवार यांनी.

Success Story
Success Story
मुंबई : मनात जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल तर अशक्य काहीच नाही, हे सिद्ध करून दाखवले आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील तरुण तुषार नंदनवार यांनी. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना चांगली नोकरी मिळाली होती. मात्र, मर्यादित पगार आणि ठराविक चौकटीत अडकलेल्या आयुष्याने ते समाधानी नव्हते. त्यामुळे नोकरीचा राजीनामा देत त्यांनी गावाकडे परत येऊन स्वतःचा मार्ग तयार केला. आज तुषार पारंपरिक शेतीला आधुनिकतेची सांगड घालत लाखोंची कमाई करणारा यशस्वी शेतकरी बनला आहे.
धडसी निर्णयाने बदललं आयुष्य
सततच्या नापिकीला कंटाळून तुषार यांनी पारंपरिक पिकांना मागे सोडत वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अर्ध्या एकर शेतीत ड्रॅगन फ्रुट लागवड करून पाहण्याचे ठरवले. सुरुवातीला 500 झाडांपासून त्यांनी या पिकाची सुरुवात केली. लागवडीचा पहिला वर्ष अत्यंत यशस्वी ठरला. चांगल्या उत्पादनामुळे त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला. या यशाने प्रेरणा मिळाल्यानंतर त्यांनी मोठा धोरणात्मक विस्तार करत आणखी 5000 ड्रॅगन फ्रुट झाडांची लागवड केली. आगामी वर्षांत यापासून त्यांना लाखोंचा मोबदला मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे.
advertisement
शेतीसोबतच दुसरा व्यवसायही यशस्वी
इंजिनिअरिंगनंतर तुषार पुण्यात नोकरी करीत होते. परंतु उत्पन्न समाधानकारक नसल्याने त्यांनी नोकरी सोडली आणि गावाकडे परतले. वर्ध्याला आल्यानंतर त्यांनी दाक्षिणात्य खाद्यपदार्थांचा गाडा सुरू केला. सकाळी ते तीन तास इडली, डोसा, उत्तप्पा आणि मेदू वडा विकतात. या व्यवसायाने त्यांना मोठे यश मिळाले असून महिन्याला दीड लाख रुपये ते सहज कमावतात. या व्यवसायातून घरची आर्थिक परिस्थिती स्थिर झाल्यानंतर त्यांनी आधुनिक शेतीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
आधुनिक शेतीचा मार्ग
वडिलोपार्जित शेती असूनही तुषार यांच्या कुटुंबाला पारंपरिक शेतीत अपेक्षित यश मिळाले नव्हते. हे पाहून त्यांनी शेतीतील बदलाची गरज ओळखली आणि आधुनिक पद्धती आत्मसात केली. ड्रॅगन फ्रुट हे कमी पाण्यातही चांगले उत्पादन देणारे आणि बाजारात महाग विकले जाणारे पीक आहे, याचा अभ्यास करून त्यांनी त्याची लागवड सुरू केली. फळाला चांगली मागणी असल्याने उत्पादन विक्रीतून त्यांना मोठा फायदा झाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
पुण्यातील नोकरी सोडली! शेतात 500 झाडं लावली, मिळतोय सोन्याचा भाव, आता तरुण करतोय लाखोंची कमाई
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement