देशी गायींची माहिती सगळ्यांना असली पाहिजे, पुण्यात सुरू झालं पहिलं गो पर्यटन, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
अलिकडच्या काळात घरोघरी असणारी देशी गाईंची संख्या कमी झाली त्यामुळे क्वचित ठिकाणी पाहिला मिळतात. परंतु आता या गाईचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, त्याचा सहवास मिळावा यासाठी पुण्यात राज्यातील पहिलाच गो पर्यटन प्रकल्प राबवला जात आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : भारतीय संस्कृतीत गाईला फार महत्त्व आहे. भारतात गोपालन हा पूर्वापार चालत आलेला कृषिपूरक व्यवसाय आहे. तसेच गाईला धार्मिक महत्त्वही आहे. त्यामुळेच हिंदू धर्मीय लोक गाईंची पूजा करतात. अलिकडच्या काळात घरोघरी असणारी देशी गाईंची संख्या कमी झाली. त्यामुळे क्वचित ठिकाणी पाहिला मिळतात. परंतु आता या गाईचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, त्याचा सहवास मिळावा यासाठी पुणे कृषी महाविद्यालयात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्यातील पहिलाच गो पर्यटन प्रकल्प राबवला जात आहे. इथे सर्व देशी गोवंशी गाईची माहिती मिळणार आहे. कशा प्रकारे हा प्रकल्प आहे? याविषयीची अधिक माहिती डॉ. सुजित भालेराव यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
चांगले अन्न जसे आपल्या शरीरासाठी चांगले आहे तसे आपल्या मनाच्या शांतीसाठी गाईबरोबर सहवास असणे गरजेचे आहे. याच संकल्पनेतून आता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. संशोधन केंद्रात 12 प्रकारच्या गाईंच्या ब्रीड या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 6 गाई, भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या 5 गाई या गो परीक्रमा या युनिटमध्ये पाहिला मिळतात. या गाईची सर्व माहिती इथे मिळते.
advertisement
इथे ग्रुपनुसार नोंदणी करू शकता. शनिवार, रविवार या बॅच घेतल्या जातात. गाईच्या सहवासात वेळ घालवणे, गाईला कुरवाळणे, मिठी मारणे या सगळ्या गोष्टींचा अनुभव हा इथे घेता येतो. याची एक बॅच ही मागील आठवड्यात झाली असून भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असणाऱ्या साहिवाल, गीर, लाल सिंधी, थारपारकर व राठी या पाचही गायी आणि वळूंचे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात एकत्रित करून संगोपन केले जात आहे.
advertisement
विशेष म्हणजे दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे हे पाचही देशी दुधाळ गोवंश एकत्र उपलब्ध असणारे हे देशातील एकमेव केंद्र आहे. याशिवाय या केंद्रावर महाराष्ट्रातील खिलार, कोकण कपिला, डांगी, देवणी, लाल कंधारी आणि गौळाऊ या गायींच्या जातींबरोबरच आंध्र प्रदेशातील जगातील सर्वात लहान उंचीची पुंगनूर आणि मिनीएचर पुंगनूर गायीचे देखील याठिकाणी संगोपन केले जाते. हा राज्यातील एकमेव प्रकल्प असून एकाच ठिकाणी या सर्व गाई पाहिला मिळतात, अशी माहिती डॉ. सुजित भालेराव यांनी दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
February 04, 2025 4:29 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
देशी गायींची माहिती सगळ्यांना असली पाहिजे, पुण्यात सुरू झालं पहिलं गो पर्यटन, Video