दुसऱ्या पिकांचा नाद सोडा! नोव्हेंबरमध्ये या पिकाची लागवड करा, ४० दिवसांत हाती येईल पैसाच पैसा

Last Updated:

Agriculture News : नोव्हेंबर महिन्यात काकडीची लागवड करणे शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. कमी कालावधीत तयार होणारं आणि बाजारात नेहमी मागणी असलेलं हे पीक योग्य नियोजन, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना लाखोंचा नफा मिळवून देऊ शकतं.

Agriculture News
Agriculture News
मुंबई : नोव्हेंबर महिन्यात काकडीची लागवड करणे शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. कमी कालावधीत तयार होणारं आणि बाजारात नेहमी मागणी असलेलं हे पीक योग्य नियोजन, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना लाखोंचा नफा मिळवून देऊ शकतं. चला जाणून घेऊ नोव्हेंबरमध्ये काकडी लागवडीचे फायदे, खर्च आणि नफा किती मिळू शकतो? याबद्दलची माहिती
काकडी लागवडीचा योग्य हंगाम
काकडीचं पीक थंड वातावरणात चांगलं वाढतं. नोव्हेंबर ते जानेवारी हा काकडी लागवडीसाठी चांगला कालावधी आहे. या काळात तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहिल्यास झाडांची वाढ आणि फळधारणा उत्तम होते. नोव्हेंबरमध्ये लागवड केल्यास फेब्रुवारीच्या अखेरीस बाजारात उत्पादन विक्रीस तयार होतं. यावेळी बाजारात भाजीपाला कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने काकडीचे दर प्रति किलो 25 रु ते 40 रु पर्यंत मिळतात.
advertisement
लागवडीसाठी आवश्यक अटी
काकडीची लागवड चांगल्या निचऱ्याच्या गाळमिश्रित किंवा मध्यम काळ्या जमिनीत करावी. लागवडीपूर्वी जमीन खोल नांगरून शेणखत किंवा सेंद्रिय खत मिसवावं. एका एकरासाठी साधारण १.५ किलो सुधारित बियाण्याची गरज असते. हायब्रिड वाण जसे काव्या, ग्रीन मेलडी, नेहा किंवा इंद्रायणी ही वाणं जास्त उत्पादन देतात.
एकरी खर्च किती येतो?
काकडी लागवडीसाठी लागणारा एकूण खर्च सुमारे ५०,००० रु ते ६०,००० रुपर्यंत येतो. यात बियाणे, खत, औषधं, मजुरी, सिंचन आणि मार्केटिंगचा खर्च समाविष्ट असतो. जर शेडनेट किंवा ड्रिप सिंचनाचा वापर केला तर खर्च थोडा वाढतो, पण उत्पन्नात लक्षणीय वाढ होते.
advertisement
उत्पन्न आणि नफा
सुधारित वाणांच्या मदतीने एका एकरातून ८० ते १०० क्विंटल काकडी उत्पादन मिळतं. दर सरासरी २५ किलो धरल्यास एकरी उत्पन्न २ ते २.५ लाखांपर्यंत मिळू शकतं. बाजारभाव जास्त असल्यास नफा ३ ते ४ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. शेडनेटमध्ये घेतलेल्या काकडी शेतीत उत्पादन अधिक आणि दर्जा उत्कृष्ट असल्याने दर प्रति किलो ४० ते ५० मिळण्याची शक्यता असते.
advertisement
शेतकऱ्यांसाठी काही टिप्स
ड्रिप सिंचन वापरल्यास पाण्याची बचत आणि उत्पादनात वाढ होते. फुलधारणेच्या काळात पाणी थांबवू नये, अन्यथा फळं गळण्याची शक्यता असते. सेंद्रिय खतं आणि जैविक कीटकनाशकांचा वापर केल्यास फळांचा दर्जा सुधारतो. काढणीच्या वेळी फळं अर्धवट हिरवी असताना तोडावी, यामुळे टिकाऊपणा वाढतो.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
दुसऱ्या पिकांचा नाद सोडा! नोव्हेंबरमध्ये या पिकाची लागवड करा, ४० दिवसांत हाती येईल पैसाच पैसा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement