IPL 2026 Trade : सगळं फिक्स झालं, रक्कम ठरली! मग अखेरच्या मिनिटात दिल्लीसोबत राजस्थानची बोलणी का फिसकटली? पाहा Inside Story

Last Updated:

IPL 2026 Trade Deal : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संजू सॅमसन आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्या अदलाबदलीसाठी सक्रिय बोलणी सुरू होती. पण...

IPL 2026 why Sanju Samson Trade Deal with delhi capitals
IPL 2026 why Sanju Samson Trade Deal with delhi capitals
IPL 2026 Sanju Samson Trade Deal : आगामी आयपीएल 2026 पूर्वी आता फ्रँचायझींची मोठी धावपळ सुरू झाल्याचं पहायला मिळतंय. खासकरून राजस्थान रॉयल्स एका ट्रेड डीलसाठी हातपाय मारताना दिसत आहे. ऑक्शनपूर्वी उलथापालथ होण्याची चिन्हे असून, राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन याच्या ट्रेडची चर्चा आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. सध्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतीये. मात्र, राजस्थानची दिल्लीसोबत चर्चा का फिसकटली? याची माहिती समोर आली आहे.

राजस्थाने एक अट ठेवली अन् सगळं फिसकटलं

संजू सॅमसनसाठी राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जशी संपर्क साधला होता, पण तेव्हा चर्चा पुढे सरकली नव्हती. कारण, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संजू सॅमसन आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्या अदलाबदलीसाठी सक्रिय बोलणी सुरू होती. या डीलवर जवळपास सहमती झाली होती, परंतु राजस्थाने एक अट ठेवली अन् संपूर्ण बैठकीवर पाणी फेरलं. स्टब्ससोबत राजस्थानने एका अनकॅप्ड खेळाडूची केलेली मागणी केली होती आणि त्यामुळे हा करार फिस्कटला.
advertisement

राजस्थानला हवा होता समीर रिझवी

राजस्थानला संजूच्या बदल्यात एक नव्हे तर दोन खेळाडू हवे आहेत. राजस्थानने दिल्लीकडे समीर रिझवी या युवा खेळाडूची मागणी केली होती. रिझवीमध्ये मोठी क्षमता असल्याने त्याला सोडायला दिल्लीचा संघ तयार नव्हता, ज्यामुळे स्टब्ससोबतचा हा ट्रेड अचानक थांबल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. दरम्यान, ट्रेडचे इतर पर्याय खुले ठेवलेल्या राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जशी संपर्क साधला अन् रविंद्र जडेजाची मागणी केली आहे.
advertisement

चेन्नईसोबत डील फिक्स होणार? 

आयपीएलच्या अन्य फ्रँचायझींसोबत झालेल्या वाटाघाटी यशस्वी न झाल्यामुळे चेन्नईमध्ये सॅमसनबद्दलची आवड कायम राहिली आहे. विकेटकीपर कॅप्टनच्या रुपात चेन्नई संजूला पाहत असल्याने आता चेन्नई राजस्थानला संजूच्या बदल्यात आणखी एक प्लेयर देणार का? असा प्रश्न कायम आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 Trade : सगळं फिक्स झालं, रक्कम ठरली! मग अखेरच्या मिनिटात दिल्लीसोबत राजस्थानची बोलणी का फिसकटली? पाहा Inside Story
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement