शेतकऱ्यांनो सावधान! PM Kisan च्या नावाखाली केले ९६ हजार रु लंपास, फसवणूक कशी टाळाल?

Last Updated:

PM Kisan Scam : पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निधी देणाऱ्या या सरकारी योजनेच्या नावाचा दुरुपयोग करून बनावट एपीके (APK) फाइल्स तयार करून नागरिकांना फसवल्याची नवी घटना समोर आली आहे.

pm kisan yojana
pm kisan yojana
मुंबई : पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निधी देणाऱ्या या सरकारी योजनेच्या नावाचा दुरुपयोग करून बनावट एपीके (APK) फाइल्स तयार करून नागरिकांना फसवल्याची नवी घटना समोर आली आहे. केरळमधील अलाप्पुझा येथील एक महिलेने एका व्हाट्सअॅप प ग्रुपमध्ये शेअर केलेल्या लिंकवर क्लिक करून पीएम-किसानशी संबंधित बनावट अॅप्स डाउनलोड केल्यावर तिच्या बँक खात्यातून सुमारे 96,312 रु काढून नेण्यात आले, अशी तक्रार नोंदवण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
महिलेने हा प्रकार समजल्यावर जिल्हा सायबर सेलला तक्रार नोंदवली. सायबर सेल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासात लक्षात आले की, व्हाट्सअप ग्रुपवर बनावट एपीके फाइल्स शेअर करून लोकांना फसवण्यात येत होते. बनावट फाइल्स डाउनलोड केल्यानंतर पीडितेच्या मोबाइलमध्ये डुप्लिकेट किंवा मालिशिअस सॉफ्टवेअर इन्स्टॉल होत असल्याचे आढळले. या सॉफ्टवेअरमुळे क्रेडिट/डेबिट कार्डची एनक्रिप्टेड माहिती चोरी करून ती ऑनलाइन खरेदीसाठी वापरली जात होती.
advertisement
पैशांचा पुरावा गोळा करण्यासाठी पोलिसांनी फ्लिपकार्ट ट्रॅन्झॅक्शन्सची चौकशी केली आणि सातत्याने झालेल्या खरेदींचा मागोवा घेतला. संशयित व्यवहारांमधून उघड झाले की, चोरी केलेल्या कार्डाचा वापर करून पाच मोबाईल फोन खरेदी केले गेले होते. खरेदी केलेल्या फोनचे आयएमईआय नंबर व टॉवर लोकेशन्स ट्रॅक करून तपासकर्त्यांनी यापैकी एक फोन मुंबाईतील धारावी परिसरात सक्रिय असल्याचे  आढळून आले. पुढील कारवाईत स्थानिक पोलिसांनी धारावीतून एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्याविरोधात सायबर गुन्हा नोंदवून पुढील चौकशी सुरू केली आहे.
advertisement
फसवणूक टाळण्यासाठी काय करावे?
सायबर सेलने नागरिकांना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी म्हंटले आहे की, कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
सरकारी योजना किंवा बँकेच्या नावाने आलेल्या अॅप्स फक्त अधिकृत वेबसाइट किंवा अधिकृत प्ले स्टोअर/अॅप स्टोअरवरूनच डाउनलोड करा.
कधीही आपल्या कार्डाची पूर्ण माहिती, OTP किंवा नेट-बँकिंग तपशील कुणाला शेअर करू नका. त्वरित बँकेत संपर्क करून संशयास्पद व्यवहार थांबवण्याचे निर्देश पाळा आणि पोलिसात तक्रार नोंदवा.
advertisement
तसेच फोनमध्ये नेहमी अप-टू-डेट ऑपरेटिंग सिस्टम आणि अधिकृत अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरण्याची, दोन-घटक प्रमाणीकरण (2FA) सक्षम ठेवण्याची आणि व्यवहारांसाठी निव्वळ ठिकाणी सुरक्षित नेटवर्क (जसे की मोबाइल डेटा किंवा ओटीपीसाठी विकत नसलेले वाय-फाय) वापरण्याची सूचना पोलिसांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांनो सावधान! PM Kisan च्या नावाखाली केले ९६ हजार रु लंपास, फसवणूक कशी टाळाल?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement