तुमची ई पीक पाहणी करायची बाकी आहे का? फक्त १ दिवस शिल्लक, या पद्धतीने करा झटपट नोंदणी
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
E Pik Pahani : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि ढगफुटी सदृश परिस्थितीमुळे खरीप हंगाम 2025 मोठ्या संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी पिके वाहून गेली, शेतजमिनी तळीमय झाल्या आहेत.
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि ढगफुटी सदृश परिस्थितीमुळे खरीप हंगाम 2025 मोठ्या संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी पिके वाहून गेली, शेतजमिनी तळीमय झाल्या या सर्व संकटात शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी प्रक्रियेतही मोठा त्रास सहन करावा लागला. वारंवार सर्व्हर डाऊन झाल्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी रखडली होती. त्यामुळे सरकारने ई-पीक पाहणीसाठीची मुदत वाढवून 30 सप्टेंबरपर्यंत केली होती. आता मुदत संपण्यास फक्त एक दिवस बाकी असून, ज्या शेतकऱ्यांनी अजून नोंदणी केलेली नाही त्यांनी तत्काळ प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
मोबाईलवरुन ई पीक पाहणी कशी करायची?
या वर्षी शेतकऱ्यांसाठी सरकारने E-Pik Pahani DCS 4.0.0 नावाचं नवीन अॅप उपलब्ध करून दिलं आहे. शेतकऱ्यांनी खालील टप्प्यांनुसार नोंदणी करायची आहे त्यासाठी
गुगल प्ले स्टोअरवरून हे अॅप डाउनलोड करा.
अॅप उघडून आधार क्रमांक आणि त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा. शेताचं क्षेत्रफळ, पेरणीची तारीख, बांधावरील झाडांची संख्या व प्रकार, तसेच पडीक किंवा चालू पडीत क्षेत्राची माहिती भरा. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक फोटो अपलोड करा.
advertisement
नवीन नियमांची अंमलबजावणी
यंदा सरकारने एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. शेताच्या सीमेजवळून 50 मीटरच्या आत दोन स्पष्ट फोटो काढून अॅपवर अपलोड करणं अनिवार्य आहे. जर माहिती अपलोड करताना काही चूक झाली तर 48 तासांच्या आत ती दुरुस्त करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अॅपमधील नवे फीचर्स
या अॅपच्या नव्या आवृत्तीत अनेक तांत्रिक सुविधा देण्यात आल्या आहेत जसे की,
advertisement
जीपीएस लोकेशन ट्रॅकिंग : शेताचं अचूक लोकेशन नोंदवले जाते.
50 मीटर फोटो व्हेरिफिकेशन : शेताची खरी माहिती तपासली जाते.
ऑफलाइन मोड : इंटरनेट नसतानाही माहिती भरता येते आणि नंतर नेटवर्क मिळाल्यावर ती अपलोड करता येते.
शेतकऱ्यांसाठी विशेष सहायक
ज्यांना मोबाईल अॅप वापरण्यात अडचण येते, त्यांच्यासाठी प्रत्येक गावात सहायक नेमले जाणार आहेत. हे सहायक शेतकऱ्यांना अॅप कसं डाउनलोड करायचं, माहिती कशी भरायची, फोटो कसे घ्यायचे आणि अपलोड करायचे याबद्दल प्रत्यक्ष मार्गदर्शन करतील.
advertisement
शेतकऱ्यांचा त्रास दुप्पट
सध्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच ई-पीक पाहणी प्रक्रियेत आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा त्रास दुप्पट झाला होता. मात्र मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 12:07 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
तुमची ई पीक पाहणी करायची बाकी आहे का? फक्त १ दिवस शिल्लक, या पद्धतीने करा झटपट नोंदणी