4 तासांत एकामागून एक 9 भूकंपाचे धक्के! मुंबईजवळच मोठं संकट, वारंवार हादरणाऱ्या जमिनीमुळे घाबरले लोक

Last Updated:

अवघ्या चार तासांत नऊ वेळा जमीन हादरल्याने लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, एखाद्या मोठ्या भूकंपाची ही नांदी तर नाही ना? या भीतीने नागरिक घराबाहेर पळून आले आहेत.

News18
News18
एकदा नाही तर तब्बल 4 वेळा धरती हादरली, महाराष्ट्राच्या अगदी जवळ असलेलं मुंबईपासून अगदी काही अंतरावर असलेल्या गुजरातमध्ये सर्वात जास्त 4 तासात भूकंपाचे धक्के बसले आहेत. गुजरातमध्ये पुन्हा एकदा निसर्गाच्या कोपाची भीती निर्माण झाली आहे. राजकोट जिल्ह्यातील उपलेटा परिसरात शुक्रवारी सकाळी एकामागून एक भूकंपाचे 9 धक्के जाणवल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. अवघ्या चार तासांत नऊ वेळा जमीन हादरल्याने लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, एखाद्या मोठ्या भूकंपाची ही नांदी तर नाही ना? या भीतीने नागरिक घराबाहेर पळून आले आहेत.
सकाळच्या शांततेत भूकंपाचा थरार
शुक्रवारी पहाटे ६:१९ वाजता भूकंपाचा पहिला मोठा धक्का बसला, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.८ इतकी नोंदवण्यात आली. त्यानंतर पुढच्या एका तासात सहा आणि चार तासांत एकूण नऊ धक्के बसले. या भूकंपांची तीव्रता २.७ ते ३.८ च्या दरम्यान होती. केवळ उपलेटाच नाही, तर धोराजी आणि जेतपूरमध्येही जमिनीखालून येणाऱ्या आवाजांमुळे आणि कंपनांमुळे लोक भयभीत झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जेतपूरमधील शाळांना तातडीने सुटी जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
केंद्रबिंदू कुठे?
भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, या सर्व भूकंपांचे केंद्रबिंदू उपलेटा शहरापासून साधारण २७ किमी अंतरावर होते. गुरुवारी रात्री ८:४३ वाजता ३.३ तीव्रतेचा धक्का बसला होता, त्यानंतर शुक्रवारी सकाळी धक्क्यांची मालिकाच सुरू झाली. महानगरपालिका आणि प्रशासनाचे पथक तातडीने उपलेटा परिसरात पोहोचले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२००१ च्या जखमा पुन्हा ताज्या
गुजरातला भूकंपाचा अत्यंत भीषण इतिहास आहे. २००१ मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात हजारो निष्पाप जीव गेले होते. कच्छ पाठोपाठ राजकोट जिल्हादेखील 'भूकंप प्रवण' क्षेत्रात (Seismic Zone) येतो. गेल्या काही महिन्यांपासून गीर सोमनाथ आणि कच्छमध्ये सातत्याने छोटे-मोठे धक्के जाणवत आहेत. एकाच दिवशी ४ तासांत ९ वेळा जमीन हादरल्याने जुन्या आठवणींनी लोकांच्या काळजात धस्स झालं आहे.
advertisement
तज्ज्ञांचा इशारा: मोठ्या संकटाची पूर्वसूचना?
भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, जमिनीखालील प्लेट्सच्या सातत्याने होणाऱ्या हालचालींमुळे हे धक्के बसत आहेत. वारंवार येणारे हे छोटे धक्के एखाद्या मोठ्या भूकंपाचे संकेत असू शकतात, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/देश/
4 तासांत एकामागून एक 9 भूकंपाचे धक्के! मुंबईजवळच मोठं संकट, वारंवार हादरणाऱ्या जमिनीमुळे घाबरले लोक
Next Article
advertisement
परळीत मोठा ट्विस्ट!  MIM ची अजित पवार गट आणि शिदें गटाशी हातमिळवणी, मुंडेंच्या बालेकिल्ल्यात खळबळ
परळीत मोठा ट्विस्ट! MIM ची अजित पवार गट आणि शिदें गटाशी हातमिळवणी, मुंडेंच्या ब
  • अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाल्याचा धक्का राजकीय धुरिणांना बसला

  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण पाहायला भेटले आहे

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने गटनेता निवडीत युती केली

View All
advertisement