Ghatkopar Railway Station : घाटकोपर स्थानकातील चेंगराचेंगरी टळणार! उभा राहतोय नवा पुल; का आहे खास?
Last Updated:
Ghatkopar Railway Bridge : घाटकोपर रेल्वे स्थानकात मेट्रो आणि लोकल प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी विद्यमान पुलाच्या बाजूला नवा पूल उभारण्यात येत आहे.
मुंबई : मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकात मेट्रो आणि लोकल प्रवाशांची मोठी गर्दी कायम असते. विशेषतहा सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही गैरसोय कमी करण्यासाठी घाटकोपर रेल्वे स्थानकातील पुलाचे रुंदीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मेट्रो-लोकल प्रवाशांना मोठा दिलासा
घाटकोपर हे मुंबईतील पहिले मेट्रो मार्गिकेचे महत्त्वाचे स्थानक आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गिकेचे शेवटचे स्थानक असल्यामुळे दररोज हजारो प्रवासी येथे उतरतात. मेट्रोमधून उतरलेले प्रवासी लोकल पकडण्यासाठी मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकाकडे जातात. या ठिकाणी मेट्रो आणि लोकल प्रवाशांची गर्दी एकाच पुलावर होत असते.
नवा पूल कुठे असेल?
सध्या असलेला पूल गर्दीच्या प्रमाणात अपुरा ठरत असल्याने प्रवाशांना चालताना अडथळे निर्माण होतात. ही समस्या लक्षात घेऊन या पुलाच्या बाजूलाच समांतर असा नवा पूल उभारण्यात येत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या पुलाचे रुंदीकरण होणार आहे.
advertisement
कधी पर्यंत पूल उभारणार?
view commentsया नव्या पुलाचे गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच पुढील कामे सुरू होणार आहेत. हा पूल थेट स्कायवॉकशी जोडण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना सुरक्षित, वेगवान आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. या पुलाच्या कामामुळे गर्दीच्या वेळेत होणारी चेंगराचेंगरी टळणार असून मेट्रो आणि लोकल प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 1:23 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ghatkopar Railway Station : घाटकोपर स्थानकातील चेंगराचेंगरी टळणार! उभा राहतोय नवा पुल; का आहे खास?










