ज्या रानात घाम गाळला; त्याच रानात रक्त वाहिलं, सांगलीच्या आजोबांना नेमकं काय झालं?

Last Updated:

Sangli News: गेल्या 75 वर्षांपासून कित्येक दुष्काळ जगलेले आणि कष्टाचा घामाने माती ओली करत शेतीशी इमान राखणारे आजोबा या वयात देखील कणखरपणे मातीशी जोडून होते.

ज्या रानात घाम गाळला; त्याच रानात रक्त वाहिलं, सांगलीच्या आजोबांना नेमकं काय झालं?
ज्या रानात घाम गाळला; त्याच रानात रक्त वाहिलं, सांगलीच्या आजोबांना नेमकं काय झालं?
सांगली: कोणाच्या आयुष्यात कुठला दिवस काय म्हणून उजाडेल सांगता येत नाही. जग कितीही पुढं गेलं तरीही काही प्रसंगांपुढे कोणाचंच काही चालत नाही. बऱ्याचदा कष्टाचं फळ सुद्धा सुखाने चाखता येत नाही. अशीच एक दुर्दैवी घटना सांगलीच्या जत तालुक्यात गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. जतच्या रावळगुंडवाडी इथं एका घटनेत ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रुद्राप्पा शंकर लांडगे असे या 75 वर्षीय शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिसर हळहळला.
दुर्दैवी इतकं की...
रुद्राप्पा लांडगे यांची शेती रावळगुंडवाडी हद्दीतील पाच्छापूर रस्त्याला आहे. शेतामध्ये सध्या रब्बी हंगामाची कामे सुरू असून पाहुण्यांच्या ट्रॅक्टरने रुद्राप्पा यांच्या शेतामध्ये नांगरणी सुरू होती. गेल्या 75 वर्षांपासून कित्येक दुष्काळ जगलेले आणि कष्टाच्या घामाने माती ओली करत शेतीशी इमान राखणारे आजोबा या वयात देखील कणखरपणे मातीशी जोडून होते. यंदाच्या पिक-पाण्यासाठी सुद्धा ते नांगरणी करत असलेल्या ट्रॅक्टर शेजारी उभे राहून अनुभवाचे सल्ले देत नांगरणी करून घेत होते.
advertisement
नेमकं झालं असं
चालक ट्रॅक्टर मागे घेत असताना अचानकपणे तोल गेला आणि ते मागे पडले. परिणामी ट्रॅक्टरचे चाक रुद्राप्पांच्या पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र अतिशय गंभीर दुखापत आणि अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
advertisement
याप्रकरणी जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र ज्या शेतामध्ये आयुष्यभर घाम गाळला त्याच शेतात दुर्दैवी घटनेने रक्त वाहिल्याने रुद्राप्पा यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
ज्या रानात घाम गाळला; त्याच रानात रक्त वाहिलं, सांगलीच्या आजोबांना नेमकं काय झालं?
Next Article
advertisement
परळीत मोठा ट्विस्ट!  MIM ची अजित पवार गट आणि शिदें गटाशी हातमिळवणी, मुंडेंच्या बालेकिल्ल्यात खळबळ
परळीत मोठा ट्विस्ट! MIM ची अजित पवार गट आणि शिदें गटाशी हातमिळवणी, मुंडेंच्या ब
  • अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाल्याचा धक्का राजकीय धुरिणांना बसला

  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण पाहायला भेटले आहे

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने गटनेता निवडीत युती केली

View All
advertisement