कुंभमेळ्यापासून ते सोईसुविधांपर्यंत! नाशिककरांना भाजप काय काय देणार? जाहीरनामा प्रसिद्ध

Last Updated:

Nashik Election 2025 : धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक विकास यांचा समतोल साधत नाशिक शहराला शाश्वत प्रगतीच्या दिशेने नेण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने मांडला आहे.

Nashik Election 2025
Nashik Election 2025
नाशिक : धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक विकास यांचा समतोल साधत नाशिक शहराला शाश्वत प्रगतीच्या दिशेने नेण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने मांडला आहे. कुंभ पर्वाच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रकाशित केलेल्याकुंभ पर्वातील अमृत वचननामा’च्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाची स्पष्ट दिशा जनतेसमोर ठेवण्यात आली असल्याचे प्रतिपादन भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी केले.
advertisement
अमृत वचननाम्यातून काय देणार?
अमृत वचननाम्याच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना केदार म्हणाले की, हा वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांचा दस्तऐवज नसून भाजपच्या लोकाभिमुख धोरणांचा, सुशासनावरील ठाम विश्वासाचा आणि विकासाच्या दूरदृष्टीचा आरसा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासकामांमुळे नाशिक शहराचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटी अभियान, पायाभूत सुविधांचा विस्तार, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि डिजिटल सुविधा यामुळे नाशिक महानगर आधुनिक व सक्षम शहर म्हणून पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध मतदारसंघांतील विकासकामांचा आढावा देताना केदार यांनी सांगितले की, आमदार देवयानी फरांदे यांच्या मतदारसंघात ३५० कोटी रुपयांहून अधिक खर्चाची विकासकामे पूर्ण झाली आहेत. आमदार सीमा हिरे यांच्या मतदारसंघात ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीतून विविध प्रकल्प राबविण्यात आले, तर आमदार राहुल ढिकले यांच्या मतदारसंघात धार्मिक व सांस्कृतिक केंद्रांच्या विकासासाठी ३०० कोटी रुपयांहून अधिक कामे पूर्णत्वास नेण्यात आली आहेत.
advertisement
या कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, भाजप महानगर सरचिटणीस सुनील देसाई, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, काशिनाथ शिलेदार, पियुष अमृतकर, राजेंद्र दराडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनील केदार यांनी जाहीरनाम्याच्या संकल्पनेत झालेल्या बदलाकडे लक्ष वेधले. आजवर निवडणुकांच्या काळात पक्ष भविष्यात पाच वर्षांत काय करणार, याची आश्वासने जाहीरनाम्यात दिली जात असत. मात्र, भाजपने यंदा सादर केलेल्या अमृत वचननाम्यात सिंहस्थ कुंभमेळ्याचा ठोस अजेंडा मांडण्यात आला असून, आतापर्यंत आमदार निधीतून कोणकोणती विकासकामे पूर्ण झाली आहेत, याची माहितीही जनतेसमोर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जाहीरनाम्याची पारंपरिक चौकट बदलून पारदर्शक आणि कामकाजावर आधारित दस्तऐवज सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
कुंभमेळा हा भाजपचा प्रमुख अजेंडा
कुंभमेळा हा भाजपचा प्रमुख अजेंडा असल्याचे सांगताना केदार म्हणाले की, आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी देशभरातून येणाऱ्या साधू, संत आणि महंत यांना आवश्यक त्या सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा भाजपचा संकल्प आहे. साधू-संतांच्या उपस्थितीमुळेच कुंभमेळ्याचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढते. त्यामुळे रामकाळ पथाचा विकास, साधू-संतांसाठी पुरेशी आरक्षित जागा, निवास, स्वच्छता, पाणी, आरोग्य व इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे भाजपच्या प्राधान्यक्रमात राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कुंभमेळ्यापासून ते सोईसुविधांपर्यंत! नाशिककरांना भाजप काय काय देणार? जाहीरनामा प्रसिद्ध
Next Article
advertisement
परळीत मोठा ट्विस्ट!  MIM ची अजित पवार गट आणि शिदें गटाशी हातमिळवणी, मुंडेंच्या बालेकिल्ल्यात खळबळ
परळीत मोठा ट्विस्ट! MIM ची अजित पवार गट आणि शिदें गटाशी हातमिळवणी, मुंडेंच्या ब
  • अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाल्याचा धक्का राजकीय धुरिणांना बसला

  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण पाहायला भेटले आहे

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने गटनेता निवडीत युती केली

View All
advertisement