advertisement

हरभरा नोंदणी प्रक्रिया सुरू! घरबसल्या मोबाईलवरुन झटपट रजिस्ट्रेशन कसं करायचं? A TO Z माहिती

Last Updated:

Harbhara Nondani Prakriya : राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत १ मार्च २०२६ पासून हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

harbhara online nondani
harbhara online nondani
मुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत १ मार्च २०२६ पासून हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत शेतकऱ्यांना हमीभावाने हरभरा विक्रीसाठी नोंदणी करता येणार आहे. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळणार असून योग्य दराची हमी मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
हरभरा हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडे आधारकार्ड, ई-पीक पाहणीसह सातबारा उतारा, आधार लिंक असलेले बँक पासबुक आणि सक्रिय मोबाईल क्रमांक असणे बंधनकारक आहे. शासनाने नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.
नोंदणी कशी करायची?
शेतकरी अधिकृत पोर्टलवरून किंवा ‘eSamriddhi’ (ई-समृद्धी) मोबाईल अॅपच्या माध्यमातून घरबसल्या नोंदणी करू शकतात. तसेच, सध्या सुरू असलेल्या तूर हमीभाव खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष जाऊनही नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून ही दुहेरी व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
‘eSamriddhi’ अॅपद्वारे नोंदणी करताना सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून अॅप डाउनलोड करावे. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून OTP द्वारे पडताळणी करावी. पुढील टप्प्यात वैयक्तिक माहिती नाव, पत्ता, जिल्हा, तालुका आणि गाव भरावी. त्यानंतर पिकांच्या तपशीलात हरभरा पिकाची निवड करून सातबाऱ्यावरील गट क्रमांक व पेरणी केलेले क्षेत्र (हेक्टर/एकरमध्ये) नमूद करावे.
यानंतर आवश्यक कागदपत्रे आधारकार्ड, सातबारा उतारा आणि बँक पासबुक अपलोड करून सर्व माहितीची खात्री करावी. सबमिट केल्यानंतर नोंदणी पूर्ण होत असून शेतकऱ्यांना एक टोकन क्रमांक दिला जातो. हा टोकन क्रमांक खरेदी प्रक्रियेदरम्यान आवश्यक ठरणार आहे.
advertisement
शासनाच्या सूचनेनुसार, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची माहिती पडताळल्यानंतरच त्यांना हमीभावाने विक्रीची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
हरभरा नोंदणी प्रक्रिया सुरू! घरबसल्या मोबाईलवरुन झटपट रजिस्ट्रेशन कसं करायचं? A TO Z माहिती
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement