advertisement

Iran Israel : भारतीय बंदरातून इराणवर अमेरिकेचे क्षेपणास्त्र हल्ले? परराष्ट्र मंत्रालयाने अखेर सगळंच सांगितलं...

Last Updated:

Israel Iran Conflict : राण-अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय बंदरांचा वापर केला जात असल्याचा दावा अमेरिकन माध्यमातून सुरू आहे.

भारतीय बंदरातून इराणवर अमेरिकेचे क्षेपणास्त्र हल्ले? परराष्ट्र मंत्रालयाने अखेर सगळंच सांगितलं...
भारतीय बंदरातून इराणवर अमेरिकेचे क्षेपणास्त्र हल्ले? परराष्ट्र मंत्रालयाने अखेर सगळंच सांगितलं...
नवी दिल्ली: इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय बंदरांचा वापर केला जात असल्याचा दावा अमेरिकन माध्यमातून सुरू आहे. या दाव्यानंतर देशभरात प्रतिक्रिया उमटू लागल्या. अशातच आता या मुद्यावर भारताच्या परराष्ट्र खात्याने भूमिका स्पष्ट केली. भारताच्या परराष्ट्र खात्यानं हा दावा फेटाळून लावला असून असले वक्तव्ये निराधार असल्याचे भाष्य केले आहे.

नेमका दावा काय होता?

'वन अमेरिका न्यूज नेटवर्क' (OANN) या अमेरिकन चॅनेलवर एका मुलाखतीदरम्यान माजी अमेरिकन लष्करी कर्नल डगलस मॅकग्रेगर यांनी खळबळजनक विधान केले होते. "अमेरिकेचे स्वतःचे तळ आणि बंदरे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यामुळे आता आम्हाला भारतीय बंदरांवर अवलंबून राहावे लागत आहे," असा दावा त्यांनी केला होता. मॅकग्रेगर यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.
advertisement

परराष्ट्र मंत्रालयानं काय म्हटलं?

MEA च्या फॅक्ट चेक टीमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करून या वृत्ताचे खंडन केले. "ही बातमी पूर्णपणे खोटी (Fake News) आहे. भारतीय बंदरांचा अमेरिकन नौदलाकडून वापर केला जात असल्याच्या टिप्पण्या बेजबाबदार आणि जाली आहेत. नागरिकांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने अशा अफवांना बळी पडू नये," असे परराष्ट्र खात्यानं सांगितले.
advertisement
advertisement

भारताची भूमिका काय?

परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, भारत या युद्धात कोणत्याही गटात सामील नाही. भारत आपली जमीन, बंदरे किंवा हवाई क्षेत्र लष्करी कारवायांसाठी कोणालाही वापरू देत नाही. या युद्धामुळे आखाती देशात राहणाऱ्या सुमारे एक कोटी भारतीय नागरिकांची सुरक्षा, भारताचा व्यापार आणि ऊर्जा पुरवठा साखळी (Energy Supply Chain) धोक्यात आली आहे. त्यामुळे भारताने नेहमीच मुत्सद्देगिरी आणि चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Iran Israel : भारतीय बंदरातून इराणवर अमेरिकेचे क्षेपणास्त्र हल्ले? परराष्ट्र मंत्रालयाने अखेर सगळंच सांगितलं...
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement