'मला राज्यसभेत जायचंय', नितीश कुमारांनी स्वत:च केली भूमिका स्पष्ट
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे राज्यसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर स्वत: नितीश कुमारांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
मागील काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे राज्यसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नितीश कुमार राज्यसभेत गेले तर बिहारचा मुख्यमंत्री भाजपचा बनेल, असं बोललं जात आहे. नितीश कुमारांनी राज्यसभेत जावं, यासाठी भाजपचा दबाव असल्याची देखील चर्चा आहे.
या सगळ्या चर्चेनंतर आता नितीश कुमार यांनी स्वत: आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहून त्यांनी राज्यसभेवर जायची आपली इच्छा असल्याचं म्हटलं आहे. मागील जवळपास दोन दशकं बिहारचं नेतृत्व करणाऱ्या नितीश कुमारांनी अशाप्रकारे भूमिका घेतल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. इथं भाजप नितीश कुमारांची सत्ता उलथवून टाकतेय का? त्यांची ताकद कमी करतेय का? अशा विविध चर्चा रंगल्या आहेत.
advertisement
नितीश कुमार नेमकं काय म्हणाले?
एक्स अकाऊंट लिहिलेल्या पोस्टमध्ये नितीश कुमार म्हणाले, गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तुम्ही माझ्यावर सातत्याने विश्वास दाखवला आहे. मला नेहमी पाठिंबा दिला आहे. तुमच्या याच ताकदीमुळे मी बिहार आणि तुमच्या सर्वांची पूर्ण निष्ठेने सेवा केली आहे. तुमच्या विश्वास आणि पाठिंब्यामुळेच आज बिहार विकास आणि आदराचं एक नवे आयाम स्वीकारत आहे. यासाठी मी यापूर्वी अनेक वेळा तुमचे आभार मानले आहेत.
advertisement
पिछले दो दशक से भी अधिक समय से आपने अपना विश्वास एवं समर्थन मेरे साथ लगातार बनाए रखा है, तथा उसी के बल पर हमने बिहार की और आप सब लोगों की पूरी निष्ठा से सेवा की है। आपके विश्वास और समर्थन की ही ताकत थी कि बिहार आज विकास और सम्मान का नया आयाम प्रस्तुत कर रहा है। इसके लिए पूर्व में…
— Nitish Kumar (@NitishKumar) March 5, 2026
advertisement
माझ्या संसदीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच, बिहार विधिमंडळ आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य होण्याची माझी इच्छा होती. ही इच्छा मी अनेकदा व्यक्त केली आहे. त्यामुळे मी आता आगामी राज्यसभा निवडणुकीत राज्यसभेचा सदस्य बनण्याचा प्रयत्न करीत आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे खात्री देतो की तुमच्याशी असलेले हे नाते भविष्यातही कायम राहील आणि विकसित बिहार उभारण्यासाठी एकत्र काम करण्याची माझी वचनबद्धता कायम राहील. बिहारमध्ये स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला माझं पूर्ण समर्थन आणि मार्गदर्शन असेल, असं नितीश कुमारांनी पोस्टमध्ये म्हटलं
Location :
Patna,Bihar
First Published :
Mar 05, 2026 1:09 PM IST







