advertisement

घरबसल्या डिजीटल सही असणारे प्रॉपर्टी कार्ड कसं काढायचे? A TO Z माहिती

Last Updated:

Property Rules : महाराष्ट्र सरकारनं नागरिकांच्या सोयीसाठी आता डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड (मालमत्ता पत्रक) ऑनलाइन उपलब्ध करून दिलं आहे. त्यामुळे आता प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी महसूल कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही.

property rules
property rules
मुंबई : महाराष्ट्र सरकारनं नागरिकांच्या सोयीसाठी आता डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड (मालमत्ता पत्रक) ऑनलाइन उपलब्ध करून दिलं आहे. त्यामुळे आता प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी महसूल कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. फक्त काही टप्प्यांतून तुम्ही घरबसल्या तुमचं प्रॉपर्टी कार्ड मोबाईलवर डाऊनलोड करू शकता.
प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय?
प्रॉपर्टी कार्ड म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या बिगरशेती मालमत्तेची अधिकृत माहिती. जसं 7/12 उताऱ्याद्वारे शेतीच्या जमिनीची माहिती मिळते, तसंच प्रॉपर्टी कार्डद्वारे घर, दुकान, बंगला किंवा व्यावसायिक इमारतीसारख्या मालमत्तेचा तपशील दिला जातो.
फी किती लागते?
महानगरपालिका क्षेत्र : 135 रु
नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्र : 90 रु
ग्रामीण क्षेत्र : 45 रु
advertisement
प्रॉपर्टी कार्ड मिळवण्याची प्रक्रिया कशी आहे?
सर्वात आधी https://bhulekh.mahabhumi.gov.in या भूमीअभिलेख पोर्टलला भेट द्या. नंतर डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड पर्याय निवडा. ‘Digitally Signed 7/12, 8A and Property Card’ या लिंकवर क्लिक करा.
लॉगिन करा
नंतर OTP आधारित लॉगिनसाठी मोबाईल नंबर टाका → OTP मिळवा → Verify करा.
Property Card पर्याय निवडा
लॉगिननंतर "Digitally Signed Property Card" या पर्यायावर क्लिक करा.
advertisement
जिल्हा, तालुका, गाव, CTS नंबर निवडा
CTS म्हणजेच City Survey Number – हा तुमच्या मालमत्तेचा सरकारी रेकॉर्डमध्ये असलेला क्रमांक आहे.
अकाउंट रिचार्ज करा
"Recharge Account" वर क्लिक करा.लागणारी फी (जसे रु 45) टाका.
UPI / डेबिट कार्ड / नेट बँकिंगद्वारे पेमेंट करा.
प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड करा
रक्कम भरल्यानंतर पुन्हा गाव व CTS नंबर निवडा → डाउनलोडवर क्लिक करा.
advertisement
प्रॉपर्टी कार्डमध्ये काय माहिती असते?
गाव, तालुका, जिल्हा
नगर भूमापन क्रमांक व क्षेत्रफळ
हक्काचा मूळ धारकाचे नाव
कायद्याने वैध डिजिटल स्वाक्षरी
फायदे काय होतात?
सरकारी व कायदेशीर व्यवहारांसाठी वापरता येण्याजोगा पुरावा
मालमत्तेच्या हक्काचे डिजिटल प्रमाणपत्र
बँक कर्जासाठी वापरता येण्याजोगा दस्तऐवज
मिळकत विक्रीसाठी आवश्यक कागदपत्र
महसूल कार्यालयाच्या भेटीशिवाय घरबसल्या उपलब्ध
डिजिटल प्रॉपर्टी कार्ड हे सरकारकडून दिलं जाणारं अधिकृत आणि सुरक्षित दस्तऐवज आहे. त्यामुळे नागरिकांनी ही सेवा अवश्य वापरावी आणि आपल्या मालमत्तेच्या अधिकाराचं सुरक्षित दस्तऐवजीकरण करून घ्यावं.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
घरबसल्या डिजीटल सही असणारे प्रॉपर्टी कार्ड कसं काढायचे? A TO Z माहिती
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement