इंदापूरच्या तरुणाचा नाद खुळा! अडीच एकरात केली जांभळाची लागवड, मालाची थेट ॲमेझॉनवर विक्री, आता करतोय लाखोंची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : शेतीतून चांगलं उत्पन्न मिळावे यासाठी बळीराजा सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतो. बाजारपेठ बदलत आहे, ग्राहकांच्या गरजा बदलत आहेत आणि त्यानुसार शेतकऱ्यांनीही आपला दृष्टिकोन आधुनिक करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : शेतीतून चांगलं उत्पन्न मिळावे यासाठी बळीराजा सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतो. बाजारपेठ बदलत आहे, ग्राहकांच्या गरजा बदलत आहेत आणि त्यानुसार शेतकऱ्यांनीही आपला दृष्टिकोन आधुनिक करण्यास सुरुवात केली आहे. इंदापूर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने अगदी याच आधुनिकतेची कास धरत आपल्या शेतातील जांभळाची विक्री थेट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर सुरू केली आहे. या उपक्रमामुळे त्याला दुप्पट फायदा होत आहे. चला तर मग जाणून घेवू त्यांची यशोगाथा..
advertisement
खडकाळ जमिनीतून सुरू झालेलं यशस्वी मॉडेल
इंदापूर तालुक्यातील कचरवाडी येथील अमर बरळ यांच्या शेतात खडकाळ जमीन आहे. पूर्वी ते डाळिंबाची शेती करीत होते. मात्र काही वर्षांपूर्वी झालेल्या गारपीटीमध्ये त्यांच्या बहुतेक बागा उद्ध्वस्त झाल्या. अचानक आलेल्या या संकटानंतर शेतकरी अमर बरळ काही काळ खचले असले तरी त्यांनी हार मानली नाही. पुढे कोकणातील शेतकरी सहलीदरम्यान त्यांना जांभूळ शेतीचं प्रशिक्षण मिळालं आणि याच प्रेरणेतून त्यांनी अडीच एकरांमध्ये जांभळाची बाग फुलवण्याचा निर्णय घेतला.
advertisement
जांभूळ हे जंगली पिक असल्याने खडकाळ जमिनीवर ते उत्तम वाढते. यावर रोगराईही कमी प्रमाणात येते, त्यामुळे फवारणीचा खर्चही कमी होतो. बाग लागवडीच्या पाच वर्षांनी जांभळाचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आणि त्यातून बरळ यांना चांगले उत्पन्न मिळू लागले. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई आणि सोलापूर बाजारपेठेत थेट विक्री करून बाजारभाव ओळखून घेतला.
advertisement
सोशल मीडियातून ई-कॉमर्सकडे झेप
आजच्या काळात सोशल मीडिया ही बाजारपेठेची नवीन दारे उघडणारी ताकद बनली आहे. याच माध्यमाचा योग्य वापर करून अमर बरळ यांनी आपल्या उत्पादनाची प्रसिद्धी सुरू केली आणि लवकरच ई-कॉमर्स दिग्गज ॲमेझॉनसोबत करार करण्यात ते यशस्वी झाले. ॲमेझॉनवर विक्री सुरू झाल्यानंतर त्यांना जांभळाला किलोला 200 ते 280 रुपये इतका दर मिळू लागला, जेव्हा की किरकोळ बाजारात त्याच जांभळाला 70 ते 150 रुपये दर मिळतो. यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट वाढले आहे. त्यांच्या शेतातील जांभळे आता पुणे, मुंबई आणि सोलापूरसारख्या शहरांतील मॉलमध्येही विक्रीस जात आहेत, तर काही माल स्थानिक बाजारपेठेलाही पुरवला जातो.
advertisement
हाताने निवड, तोडणी आणि पॅकिंग
बरळ यांच्या कुटुंबाचा संपूर्ण सहभाग या उपक्रमात आहे. जांभळाची तोडणी घरच्या घरीच केली जाते. निवड करून पॅकिंगसाठी तयार केलेला माल ते थेट टेंभुर्णी येथील ॲमेझॉन सेंटरवर पाठवतात. स्वच्छ, सुव्यवस्थित आणि आकर्षक पॅकिंगमुळे ग्राहकांचा विश्वास वाढत आहे आणि पुनर्वापर ऑर्डरची संख्या देखील वाढत आहे.
advertisement
आधुनिक शेतीचा प्रेरणादायी नमुना
अमर बरळ यांची ही पुढाकारशील भूमिका सध्या जिल्हाभर चर्चेत आहे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना आणि नवीन मार्केटिंग पद्धती वापरल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते, याचा हा उत्कृष्ट नमुना आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2025 7:26 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
इंदापूरच्या तरुणाचा नाद खुळा! अडीच एकरात केली जांभळाची लागवड, मालाची थेट ॲमेझॉनवर विक्री, आता करतोय लाखोंची कमाई


