SatBara Utara : घरबसल्या मोबाईलवरुन काढा 1980 ते 2025 पर्यंतचे सातबारा उतारे, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

Last Updated:

Agriculture News : शेतजमीन म्हंटलं की सातबारा आलाच. शेतजमिनीच्या वाटणीवरुन अनेक व्यक्तींच्या घरात नेहमी वाद होत असतात. इतकेच नव्हे तर हे प्रकरणे कोर्टामध्ये सुद्धा जाऊन पोहोचतात. आणि आजही त्यासंदर्भातील अनेक निकाल हे प्रलंबित आहेत. अशा वेळेस तुम्हाला त्या संदर्भातील नियम माहीत असणे आवश्यक असतात. वडिलांच्या ऐवजी दुसऱ्या व्यक्तीचे नाव सातबाऱ्याला लागले आहेत अशी तक्रार हे अनेक जण करत असतात.

News18
News18
मुंबई : शेतजमीन म्हंटलं की सातबारा आलाच. शेतजमिनीच्या वाटणीवरुन अनेक व्यक्तींच्या घरात नेहमी वाद होत असतात. इतकेच नव्हे तर हे प्रकरणे कोर्टामध्ये सुद्धा जाऊन पोहोचतात. आणि आजही त्यासंदर्भातील अनेक निकाल हे प्रलंबित आहेत. अशा वेळेस तुम्हाला त्या संदर्भातील नियम माहीत असणे आवश्यक असतात. वडिलांच्या ऐवजी दुसऱ्या व्यक्तीचे नाव सातबाऱ्याला लागले आहेत अशी तक्रार हे अनेक जण करत असतात. तर जुन्या नोंदी असलेले सातबारा उतारे शोधण्यास शेतकऱ्यांना अडचणी येतात. मग आता याच समस्येवर आम्ही उपाय सांगणार आहोत. तुम्ही मोबाईलद्वारे 1980 ते 2025 पर्यंतचे सातबारा उतारे काढू शकता. ते कसे पाहूया..
राज्य सरकारने शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने सातबारा उतारा काढता यावा यासाठी महाराष्ट्र भूमि अभिलेख विभागाअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या वेब पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या 1980 पासूनचे सातबारा उतारे आणि फेरफार काढू शकता. सातबारा उतारे डाऊनलोड करून तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता.
सातबारा उतारा कसा काढालं?
सर्वप्रथम तुम्हाला गूगल क्रोम किंवा इतर कुठल्याही वेब ब्राऊझरमध्ये जावून त्यामध्ये अभिलेख असा मजकूर
advertisement
टाईप करावा.
त्यानंतर पोर्टलवर आपली वैयक्तिक माहिती भरावी, जसे की, घराचा पत्ता, नाव, मोबाईल नंबर इत्यादी ही माहिती भरल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होते.
त्यानंतर उतारा काढण्यासाठी तुम्हाला जिल्हा, तालुकाम गावाचे नाव निवडावे लागेल. त्यानंतर तुम्हाला कोणता उतारा हवा आहे. त्याची निवड करावी लागते.
जर तुम्हाला सातबारा 8 अ चा उतारा हवा असेल तर तर सर्च मध्ये 8 अ असे टाइप करावं लागेल. त्यानंतर पुढे गट क्रमांक टाकून आपला उतारा शोधू शकता. तुम्हाला ज्या वर्षाचा सातबारा हवा आहे. त्या वर्षावर क्लीक करून तो काढू शकता.
मराठी बातम्या/कृषी/
SatBara Utara : घरबसल्या मोबाईलवरुन काढा 1980 ते 2025 पर्यंतचे सातबारा उतारे, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement