Dharashiv News : सोयाबीनवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, सोयाबीनची पानगळ, कृषी विभागाने काय म्हटलं, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
या रोगाचे शेतकऱ्यांनी वेळेत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. मात्र, हा रोग झपाट्याने वाढत असल्याने सोयाबीनची पाने पिवळी पडून पानगळ होत आहे.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा झाला आहे. यावर्षीच्या खरिपात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने सोयाबीनचे पीक चांगले आले होते. मात्र, सुरुवातीपासूनच अळ्यांचा प्रादुर्भाव, यलो मोझॅक आणि आता तांबेरा यामुळे सोयाबीनच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
सोयाबीनचे पीक सध्या शेंगा परिपक्वतेच्या अवस्थेत आहे. मात्र, तांबेरा रोगाने थैमान घातले असून सोयाबीनच्या पानांवर ठिपके दिसून येत आहेत आणि त्यानंतर कोवळ्या खोडावर कोवळ्या शेंगावरती हे ठिपके दिसून येत आहेत.
advertisement
सततचा पाऊस ढगाळ हवामान तसेच हवेत 80 टक्के आर्द्रता हे या रोगाच्या वाढीस अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून प्लॉटमधील सर्व सोयाबीनची पाने पिवळी पडली आहेत.
advertisement
या रोगाचे शेतकऱ्यांनी वेळेत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. मात्र, हा रोग झपाट्याने वाढत असल्याने सोयाबीनची पाने पिवळी पडून पानगळ होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
September 12, 2024 3:39 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Dharashiv News : सोयाबीनवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, सोयाबीनची पानगळ, कृषी विभागाने काय म्हटलं, VIDEO