सेलिब्रेटींच्या घरी अवतरल्या 'बया', संगीतकार प्रशांत नाक्तीच्या घरचा सुंदर असा देखावा पाहिला का, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
देखाव्याचा विशेष भाग म्हणजे या देखाव्यातील ज्या लहान बाहुलीच्या कलाकृती आहेत त्या विशेष पुण्यावरून मागवण्यात आल्या आहेत.
निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : सर्वत्र लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. अनेक सेलिब्रेटींच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले आहे. यातच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'नाच गो बया' या गाण्याची थीम घेऊन गाण्याचे दिग्दर्शक आणि संगीतकार प्रशांत नाक्ती यांनी त्यांच्या घरी बाप्पाचा देखावा साकारला आहे.
या गाण्याची थीम महिलांना त्यांच्या फावल्या वेळातून वेळ काढून स्वतःच्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी प्रोत्साहित करते. याच गोष्टीला ध्यानात ठेवून हा देखावा साकारण्यात आला आहे.
advertisement
सोनाली सोनावणे, निक शिंदे, प्रशांत नाक्ती आणि इतर मंडळींनी हा देखावा तब्बल 2 दिवसांमध्ये साकारला आहे. देखाव्याचा विशेष भाग म्हणजे या देखाव्यातील ज्या लहान बाहुलीच्या कलाकृती आहेत त्या विशेष पुण्यावरून मागवण्यात आल्या आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे, या देखाव्यातील सर्व बायका मॉर्डन जरी वाटत असल्या तरी त्यांनी संस्कृती जपत पारंपारिक पोशाख म्हणजेच मराठमोळी साडी सोबतच चंद्रकोर टिकली आणि साजेशी नथ हा श्रृंगार केलेला पहायला मिळतो.
advertisement
या देखाव्यात महादेवाची पिंडी, विहीर आणि तुळशी वृंदावनाला पुजाणाऱ्या महिला दिसतात. वारली चित्र आणि तारपा संस्कृती, बैलगाडी एकंदरीतच छोटं गाव आणि गावात असणाऱ्या वेगवेगळ्या भूमिका पार पाडणाऱ्या सगळ्या महिला एकत्र आल्या आहेत.
advertisement
या देखाव्यातून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला जातो आहे. सर्व महिला एकत्रित येऊन एकमेकांना प्रोत्साहन करत आहेत आणि सक्षमपणे उभे आहेत. मॉर्डन असून सुद्धा आपली संस्कृती न विसरता एकत्र येऊन सण कसा साजरा करतात याचे उत्तम उदाहरण यातून साकारण्यात आले आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2024 12:44 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
सेलिब्रेटींच्या घरी अवतरल्या 'बया', संगीतकार प्रशांत नाक्तीच्या घरचा सुंदर असा देखावा पाहिला का, VIDEO