दोन महिन्यांचा कालावधी, 50 हजार खर्च, छत्रपती संभाजीनगरमधील बडीशेपच्या गणपती मूर्तीची सर्वत्र चर्चा, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना गणेश मंडळाने बडिशेप पासून गणपती बाप्पाची मूर्ती तयार केलेली आहे. लोटाकारंजा परिसरात असलेल्या संत सेना चौक मुलमची बाजार सराफ रोड या ठिकाणी ही मूर्ती बसवण्यात आली आहे.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : सध्या सर्वत्र गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन झाले आहे. आपण सर्वांनी अगदी भक्तीने आनंदाने आणि उत्साहामध्ये बाप्पाचं स्वागत केलेले आहे. अनेक मंडळांनीही गणपती मूर्तीची स्थापना केली आहे. पण सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात एका बडीशेपच्या गणपती मूर्तीची खूप चर्चा होत आहे. याचबाबत घेतलेला हा आढावा.
छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना गणेश मंडळाने बडिशेप पासून गणपती बाप्पाची मूर्ती तयार केलेली आहे. लोटाकारंजा परिसरात असलेल्या संत सेना चौक मुलमची बाजार सराफ रोड या ठिकाणी ही मूर्ती बसवण्यात आली आहे. हे मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या गणपती बाप्पाच्या मूर्ती तयार करतात. त्यांनी कधी डाळीपासून, कधी मक्यापासून असे वेगवेगळ्या धान्यापासून ते मूर्ती करतात. यावर्षी देखील त्यांना अशीच पर्यावरणपूरक मूर्ती तयार करायची होती, म्हणून त्यांनी बडीशेपची मूर्ती तयार करायचा ठरवले.
advertisement
यावर्षी त्यांनी बडीशेप पासून मूर्ती तयार केलेली आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी त्यांना दोन महिन्याचा कालावधी लागला. तसेच ही मूर्ती तयार करण्यासाठी त्यांना 48 बांबू आणि 125 ते 130 किलो बडीशेप लागली. ही मूर्ती तयार करताना त्यांनी कुठल्याही आर्टिफिशियल डिंकचा वापर केलेला नाही. त्यांनी होममेड असा डिंक तयार केला आहे आणि त्यापासूनच ही सर्व बडीशेप त्याला चिटकवलेली आहे. या मूर्तीची उंची 12 फूट इतकी आहे. ही गणपती बाप्पाची मूर्ती आनंदा जातेकर गोविंदा जातेकर आणि अमन कंचनकर यांनी मिळून तयार केलेली आहे.
advertisement
मूर्तिकार अमन कंचनकर सांगतात की, ही मूर्ती बनण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली. दोन वेळा आमची मूर्ती पावसामध्ये भिजली. त्यात पण आमचे थोडेसे नुकसान झाले आणि आम्ही घरगुती डिंक वापरत होतो. त्यामुळेदेखील आम्हाला थोडीशी अडचण आली. मात्र, नंतर आम्ही व्यवस्थित डिंक तयार करून रात्रंदिवस काम करुन ही मूर्ती तयार केली. आमच्या मंडळातील मंडळाध्यक्ष सनी पारसवार व इतरही मंडळातील सदस्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. ही मूर्ती करण्यासाठी आम्हाला तब्बल 50 हजार रुपये एवढा खर्च आला आहे. ही मूर्ती पर्यावरणपूरक आहे. यामुळे पर्यावरणाला कुठलीही हानी होत नाही, असे त्यांनी सांगितले.
advertisement
तुम्हालाही ही मूर्ती बघायची असेल तर तुम्हीही छत्रपती संभाजी नगर शहरातील लोटा कारंजा या भागात असलेल्या मुलमची बाजार सराफ रोड या ठिकाणी जाऊन शिवसेना गणेश मंडळाच्या या मूर्तीला पाहू शकता दर्शन घेऊ शकता.
advertisement
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 11, 2024 5:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
दोन महिन्यांचा कालावधी, 50 हजार खर्च, छत्रपती संभाजीनगरमधील बडीशेपच्या गणपती मूर्तीची सर्वत्र चर्चा, VIDEO