बाप्पाच्या मूर्तीत साकारले कल्की अवतार, उंचीही तब्बल 47 फूट, खेतवाडीच्या 11व्या गल्लीत होतेय भाविकांची गर्दी, VIDEO

Last Updated:

भ्रष्टाचार असेल किंवा बदलापूरमध्ये झालेली घटना असेल, कोलकत्तामधील डॉक्टर तरुणीचा बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण असेल. या घटना आताच्या या कलयुगात होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बाप्पाच्या रुपात कल्की अवतार 47 फूट उंच मूर्तीमध्ये साकारून येणाऱ्या गणेश भक्तांचे लक्ष वेधले आहे.

+
बाप्पाच्या

बाप्पाच्या मूर्तीत साकारले कल्की अवतार

प्रतिकेश पाटील, प्रतिनिधी
मुंबई : मुंबईमधील गिरगाव येथील खेतवाडीमध्ये छोट्या गल्लीमध्ये विविध रुप घेतलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आणि मोठे देखावे असतात. पण यामध्ये यंदा खेतवाडी 11 व्या गल्लीतील गणपती बाप्पाच्या मूर्तीने लक्ष वेधले आहे. यंदा महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्तीपैकी 47 फूट उंच असणारी भगवान विष्णूच्या 10 वा अवतार कल्की या रुपात साकारण्यात आली आहे. बाप्पाच्या या मूर्तीने सर्व गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचबाबत लोकल18 ने घेतलेला हा आढावा.
advertisement
भ्रष्टाचार असेल किंवा बदलापूरमध्ये झालेली घटना असेल, कोलकत्तामधील डॉक्टर तरुणीचा बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण असेल. या घटना आताच्या या कलयुगात होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बाप्पाच्या रुपात कल्की अवतार 47 फूट उंच मूर्तीमध्ये साकारून येणाऱ्या गणेश भक्तांचे लक्ष वेधले आहे.
येलूरच्या शफी भैय्यांची मोफत रिक्षासवारी, 9 वर्षांची अनोखी परंपरा, जिथे हिंदू मुस्लीम एकतेचे होते दर्शन! VIDEO
कल्की अवतार येत असताना परशुराम भगवान आणि त्यांना कुऱ्हाड दिली होती. त्याचबरोबर विष्णू भगवान यांनी शंख दिले होते. असे प्रत्येक देवाने त्यांचे एक अंश देऊ कलकी या अवताराला साकारले. असे सर्व दृश्य या मूर्तीत साकारण्यात आले आहे.
advertisement
Kolhapur : मानाचा प्रथम गणपती! जिवंत वाघ अन् अस्वल आणण्यापासून ते समाजप्रबोधन, 150 वर्षांची अनोखी परंपरा, VIDEO
भारतात वाढता भ्रष्टाचार, लूटमार, चोरी त्याचबरोबर लहान मुलींवर, महिलांवर होणारे अत्याचार या सर्व गोष्टींना संपवण्यासाठी विष्णूचे दहावे अवतार कल्की धरतीवर अवतरले आहेत. भारतीय नागरिकांनी एकमेकांना सहायता केली पाहिजे. त्याचबरोबर वाढता भ्रष्टाचार आणि महिलांसोबत होणारे अत्याचार कमी झाले पाहिजे. त्यांचा सन्मान केला पाहिजे, असा संदेश सर्व गणेश भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या मंडळाकडून केला जात आहे. दरम्यान, याठिकाणी या कल्की अवतारातील गणेशाचे दर्शन करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
बाप्पाच्या मूर्तीत साकारले कल्की अवतार, उंचीही तब्बल 47 फूट, खेतवाडीच्या 11व्या गल्लीत होतेय भाविकांची गर्दी, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement