Kolhapur : मानाचा प्रथम गणपती! जिवंत वाघ अन् अस्वल आणण्यापासून ते समाजप्रबोधन, 150 वर्षांची अनोखी परंपरा, VIDEO

Last Updated:

यंदाचे हे या मंडळाचे 150 वे वर्ष आहे. मंडळाला 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे यंदा याठिकाणी अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. या 15 दशकांत उत्कृष्ट पद्धतीन सामाजिक प्रबोधन करत मंडळाने समाजात आज एक वेगळी छाप सोडली आहे.

+
तुकाराम

तुकाराम माळी मंडळ गणेशोत्सव कोल्हापूर

निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूरचा गणेशोत्सव म्हटल्यावर मानाच्या पहिल्या तुकाराम माळी मंडळाच नाव आवर्जून समोर येते. कोल्हापूर शहरातील पहिला मानाचा गणपती असलेल्या तुकाराम माळी तालीम मंडळाने आत्तापर्यंत अनेक मंडळासमोर आदर्श ठेऊन सामाजिक उपक्रम राबवले आहेत. काही वर्षांपूर्वी तालमीने गणेशोत्सवातील सजीव देखाव्यात स्टेजवर आणलेल्या जिवंत वाघ, अस्वल आणि नागाची चर्चा मात्र आजही होते.
advertisement
यंदाचे हे या मंडळाचे 150 वे वर्ष आहे. मंडळाला 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे यंदा याठिकाणी अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. या 15 दशकांत उत्कृष्ट पद्धतीन सामाजिक प्रबोधन करत मंडळाने समाजात आज एक वेगळी छाप सोडली आहे. यंदाच्या वर्षीही या मंडळाने सामाजिक संदेश देण्यासोबतच मंडळाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी मंडळाची स्थापना झालेल्या वर्षांपासून मंडळासाठी सेवा देत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करायचे ठरवले आहे.
advertisement
मंडळाचा रंजक इतिहास -
लोकमान्य टिळक यांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची मुहूर्तमेढ रोवली, तो उद्देश डोळ्यांसमोर ठेवून कार्यरत असण्याचा आपल्या मंडळाचा मानस आहे. थोडक्यात समाजप्रबोधन हे या मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. भागातल्या युवकांना र्मदानी खेळ व कुस्तीची आवड निर्माण व्हावी म्हणून तुकाराम विठू माळी यांनी जागा दिली. म्हणून ही तालीम पुढे 'तुकाराम माळी तालीम मंडळ' म्हणून 1875 साली उदयाला आली. 1970 सालापासून गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात या तालीम मंडळाच्या गणेशपूजनाने होते. त्या वेळेपासून आजतागायत 'प्रथम मानाचा गणपती' म्हणून या मंडळान अबाधित ठेवले आहे.
advertisement
वर्षानुवर्षे शिस्तबध्द मिरवणूक, सर्वांसमोर ठेवला आदर्श -
मंडळाच्या शेकडो महिला कार्यकर्त्या एकसारखी वेशभूषा परिधान करून झिम्मा-फुगडी खेळत मिरवणुकीत सहभागी होतात. पुरुष कार्यकर्तेही पांढरा पोशाख, भगवी टोपी अथवा फेटे घालून सहभागी होतात. तालमीची मिरवणूक कायम शहरवासियांच्या उत्सुकतेचा विषय ठरते. आतापर्यंत मंडळाने ढोल, ताशा, झांजपथक, पोलिस बँड, धनगरी ढोल या पारंपरिक वाद्यांत मिरवणूक काढली आहे. शिस्तबद्ध मिरवणूक व प्रबोधनात्मक देखावे सादर करुन मंडळाने अनेक बक्षिसे पटकावली आहेत. मंडळाने यंदा रस्त्यावर मंडप न घालता तालमीच्या आतील पॅसेजमध्ये भव्य मंडप घालून आकर्षक सजावट करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा रिकाम्या पदपथावर समाजप्रबोधन, ऐतिहासिक, चालू घडामोडी या विषयांवर वेगळ्या पद्धतीने सादरीकरण केले जाणार आहे.
advertisement
विविध सामाजिक प्रश्नांवर आणि उपक्रमांवर भर -
हुंडाबळी, नेत्रदान, देहदान, अंधश्रद्धा निर्मूलन, भारत आज-काल, गणपती बाप्पा मोरया, रामराज्य येईल का, पुरुष भ्रूणहत्या, आदी विषयांवर देखावे सादर केले आहेत. याशिवाय मिरवणूक मार्गावर दुर्मीळ व औषधी रोपांचे वाटप केले जाते. मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नेत्रदान संकल्प केला आहे. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur : मानाचा प्रथम गणपती! जिवंत वाघ अन् अस्वल आणण्यापासून ते समाजप्रबोधन, 150 वर्षांची अनोखी परंपरा, VIDEO
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement