गणेशोत्सवात घरी बनवा कोकणातील प्रसिद्ध गोड गुलगुले, चव भारी, रेसिपीही अगदीच सोपी, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
गव्हाच्या पिठाचे गोड गुलगुले शरीरासाठी पौष्टिक तर असतातच पण चविष्टसुद्धा असतात. नेमकं हे गोड गुलगुले कसे तयार करतात, याची रेसिपी काय आहे, ते जाणून घेऊयात.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : सध्या सर्वत्र अत्यंत उत्साहात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणरायाच्या आगमाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. कोकणात अनेक ठिकाणी गणेशोत्सवाच्या वेळेस वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात. त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे गोड गुलगुले. हे गव्हाच्या पिठाचे गोड गुलगुले शरीरासाठी पौष्टिक तर असतातच पण चविष्टसुद्धा असतात. नेमकं हे गोड गुलगुले कसे तयार करतात, याची रेसिपी काय आहे, ते जाणून घेऊयात.
advertisement
गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवण्यासाठी साहित्य -
एक ग्लास पाणी, एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी गूळ, वेलची पावडर.
गुलगुले बनवण्याची कृती -
सर्वप्रथम एका वाटीमध्ये एक ग्लास पाणी ओतून त्यात एक वाटी गूळ टाकावे. हे पाण्यात टाकलेले गूळ व्यवस्थित विरघळून घ्यावे आणि पाणी व गूळ एकत्र करावे. पाणी आणि गुळ एकजीर्ण झाल्यानंतर, त्यामध्ये गव्हाचे पीठ घालावे आणि पुन्हा मिक्स करून घ्यावे. आता गव्हाच्या पिठामध्ये थोडी चवीसाठी वेलची पावडर टाकावी. यानंतर पुन्हा सगळे पीठ एकत्र करून घ्यावे. हे पीठ आता 6 ते 7 तास झाकून ठेवावे. 6 ते 7 तासानंतर गरम तेलामध्ये चमच्याने हे गोळे करुन तळून घ्यावे.
advertisement
अशा पद्धतीने मऊ आणि लुसलुशीत गव्हाच्या पिठाचे गोड गुलगुले तयार आहेत. हे तुम्ही गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवू शकता.
advertisement
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 10, 2024 7:32 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
गणेशोत्सवात घरी बनवा कोकणातील प्रसिद्ध गोड गुलगुले, चव भारी, रेसिपीही अगदीच सोपी, VIDEO