सीताफळचे फायदे आहेत खूपच, अनेकांना माहिती नसेल, आरोग्य तज्ञांनीच दिली ही महत्त्वाची माहिती, VIDEO

Last Updated:

मुख्य फायदा म्हणजे या फळांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता अधिक असते. त्याचबरोबर त्याचबरोबर यामध्ये कॅरोटीनॉइड देखील आढळतं जे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतं. 

+
सीताफळ

सीताफळ या फळाचे आरोग्यदायी लाभ

प्रशांत पवार, प्रतिनिधी
बीड : आरोग्यदायी जीवनशैली जगण्यासाठी नियमितपणे संतुलित आहार आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. यामध्ये पालेभाज्यांसह फळांचा देखील समावेश असायला पाहिजे. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे आपल्याला पाहायला मिळतात. या फळांपैकी एक असणार म्हणजे सीताफळ.
सीताफळ हे फळ सगळ्यांनाच खायला आवडते. या फळाचे अनेक आरोग्यदायी लाभ आहेत. या फळाबद्दल अधिक माहिती बीड येथील आरोग्यतज्ञ अपर्णा बोरचाटे यांनी दिली.
advertisement
शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती : साताऱ्यातील ही अनोखी परंपरा नेमकी काय?, VIDEO
सीताफळ या फळाबद्दल माहिती जाणून घेताना सर्वात मुख्य फायदा म्हणजे या फळांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता अधिक असते. त्याचबरोबर त्याचबरोबर यामध्ये कॅरोटीनॉइडदेखील आढळते. जे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते. यामध्ये फ्लेमेनॉईड्स कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव होतो.
advertisement
सिताफळाचे सेवन केल्याने हृदयनिरोगी राहते आणि मधुमेहापासून आराम मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर सीताफळामध्ये अधिक प्रमाणात फायबरचे प्रमाण आढळते. या फायबर्समुळे पचन संस्था तंदुरुस्त राहते आणि पोटातील गॅस, ऍसिडिटी आणि त्याचबरोबर अपचनाच्या समस्यांपासून आरामदेखील मिळतो, अशी माहितीही त्यांनी दिली.
advertisement
सूचना - ही माहिती आरोग्यतज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
सीताफळचे फायदे आहेत खूपच, अनेकांना माहिती नसेल, आरोग्य तज्ञांनीच दिली ही महत्त्वाची माहिती, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement